Swapnil Joshi Video Instagram
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi Video: 'अशी बायको सर्वांना मिळो' असं का म्हणाला स्वप्नील जोशी?; Video ची होतेय चर्चा...

Swapnil Joshi News: स्वप्नील जोशीचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Swapnil Joshi Video

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्नील जोशी कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता सध्या 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोमध्ये जजचे पात्र साकारत आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून स्वप्निल जोशीने आपल्या चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. सध्या स्वप्नील जोशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्याने पत्नीबद्दल भाष्य केलं आहे.

स्वप्नील जोशीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक रील शेअर केला आहे. या रिलमध्ये तो बायकोबद्दल काही तरी बोलताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्वप्निलने त्यालाे 'अशी बायको सर्वांना मिळो' असे कॅप्शन दिले आहे. स्वप्नीलच्या या मजेशीर व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. हसण्याचे इमोजी देखील चाहत्यांनी प्रतिक्रियेत दिले आहेत.

स्वप्नील जोशी लवकरच 'इंद्रधनुष्य' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘इंद्रधनुष्य’ या या चित्रपटाची सध्या परदेशात शुटिंग सुरु आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत स्वप्नील जोशीसोबत सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला.

स्वप्नील जोशीच्या कामाबद्दल बोलायचे तर, परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी'मध्ये स्वप्नील जोशीने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये त्याच्यासोबत शिवानी सुर्वे, अनिता दाते आणि सुबोध भावे हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘इंद्रधनुष्य’ व्यतिरिक्त तो ‘जिलबी’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या मित्रपक्षात मोठी फूट; ३६ आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुकारले बंड, राजकारणात खळबळ

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

Kavala Kiti Varsh Jagto: कावळ्याचं आयुष्य किती असतं? किती वर्ष जगतो? माहितीये का

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल 415 रुपयांपार, पाकिस्तानी जनतेची झोप उडाली

Petrol Pump Free Facilities: पेट्रोल पंपावर मोफत मिळतात या ५ गोष्टी, तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT