Shiv Thakare On Daisy Shah: डेझी शाहसोबत जुळलंय का? शिव ठाकरेच्या उत्तराने चर्चांना आणखी ऊत

Khatron Ke Khiladi 13: 'खतरों के खिलाडी १३'मध्ये सहभागी झालेल्या शिव ठाकरे आणि डेझी शाह यांची जोरदार चर्चा आहे.
Shiv Thakare And Daisy Shah
Shiv Thakare And Daisy ShahInstagram @shivthakare9

Shiv Thakare And Daisy Shah Relationship:

'खतरों के खिलाडी १३' टीव्हीवरील सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो आहे. या शोचे सूत्रसंचालन दिग्दर्शक रोहित शेट्टी करतो. या शोमध्ये टेलेव्हीजनवरील प्रसिद्ध चेहरे खतरनाक स्टंट करताना दिसतात. यावेळी या शोमध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज सहभाग झाले होते.

'खतरों के खिलाडी १३'मध्ये बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि सलमान खानच्या चित्रपटातील हिरोईन डेझी शाह देखील होती. दोघांची केमिस्ट्री खूप जबदस्त आहे. त्यांचं बॉडिंग पाहून ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिव आणि डेझीमध्ये नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यास त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

Shiv Thakare And Daisy Shah
Aai Kuthe Kay Karte Update: देशमुखांवर नवं संकट; दहीहंडीच्या दिवशी संजनाचा मोठा अपघात

शिव ठाकरेने त्याच्या आणि डेझी शाहच्या नात्याचा खुलासा केला आहे. शिव ठाकरेने नुकतीच इन्फ्लुएन्सर फैजल शेखच्या चॅट शोला हजेरी लावली होती. गप्पा मारतानाला फैजल शेखने शिव ठाकरेला डेझी शाहच्या नावाने चिडवायला सुरुवात केली. यावर शिवने सांगितले की, 'आम्ही फक्त चांगले फ्रेंड आहोत.'

फैजल शेख गंमतीने शिवला म्हणाला, 'शिव ठाकरेची सकाळ डेझी असते ' यावर उत्तर देत शिव म्हणाला, नाही यार, माझी सकाळ, दुपार, रात्र काहीच डेझी नाहीये. शिवने सांगितले की त्याची स्ट्रॉंग बॉंडिंग डिनोसोबत आहेत. शिव रोमँटिक आणि ब्रोमान्स असलेल्या चित्रपटांचे उदाहरण देत म्हणाला, आजकल लोकांना ब्रदर्स चित्रपट आवडत नाहीत. लोकांना 'कुछ कुछ होता हैं' बघणं पसंत करतात. तुम्ही 'ब्रदर्स' आणि 'कुछ कुछ होता हैं' रिलीज करा, परंतु लोक 'कुछ कुछ होता हैं' बघतील.' (Latest Entertainment News)

शिव ठाकरे आणखी एक किस्सा शेअर करत म्हटले की, 'कलर्सच्या टीमने आम्हाला बोलावले होते, शीजान खान आला नव्हता. आम्ही तिघे होतो, मात्र माझा आणि डेझीलाच कॅप्चर केलं. त्यांनी व्हिडिओमध्ये स्लोमोशन अॅड केलं, ईमोजी टाकले आणि गाणं पण टाकलं. जर मी प्रेक्षक असतो तर मला देखील असाच काहीतरी वाटलं असत. मी विचार केला यात प्रेक्षकांची काय चूक आहे. चित्रपट देखील असेच बनवले जातात ना.' (Khatron Ke Khiladi)

शिवने डेझी त्याच्या जस्ट फ्रेंड असल्याचे म्हटले आहे. असे अनेक सेलिब्रिटी आहेत हे आधी जस्ट फ्रेंड होते आणि त्यानंतर रिलेशनशिपमध्ये आले. शिव आणि डेझी यांची ही जस्ट फ्रेंडशिप नात्यामध्ये बदलेल का? यांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com