Swapnil Joshi Saam tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi : हिंदी शिकणाऱ्यांना हिंदी शिकू द्यावी, पण...; मराठीच्या मुद्यावर स्वप्निल जोशी स्पष्टच बोलला

Swapnil Joshi on marathi language controversy :मराठीच्या मुद्यावर स्वप्निल जोशी याने परखड मत व्यक्त केलं आहे.

Vishal Gangurde

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

Swapnil joshi News : राज्यात मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात मराठीच भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, अशी परखड भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. मराठी भाषेवरून आता कलाकारांकडूनही भाष्य करु लागले आहेत. रेणुका शहाणे यांच्यानंतर अभिनेता स्वप्निल जोशीनेही मोठं भाष्य केलं आहे.

धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून वन मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या कार्यक्रमाला अभिनेता स्वप्निल जोशी देखील पोहोचला होता. या कार्यक्रमादरम्यान स्वप्निल जोशी याने मराठीच्या मुद्द्यावर परखड मत व्यक्त केलं आहे. राज्यात हिंदी भाषा सक्ती नको असल्याचे अभिनेता स्वप्निल जोशी याने म्हटलं आहे.

'हिंदी ज्यांना शिकायची असेल, त्यांना हिंदी भाषा शिकू द्यावी. पण हिंदी भाषा सक्तीची नको. असं मराठी म्हणून माझं वैयक्तिक मत आहे, असं स्वप्निल जोशी म्हणाला. मराठी हिंदीच्या वादावर अभिनेता स्वप्निल जोशीनेही हिंदी सक्तीला विरोध केला आहे.

ऑनलाईन जाहिरातीवर स्वप्निल जोशी काय म्हणाला?

स्वप्निल जोशी म्हणाला, 'मी पाच वर्षांपूर्वी या जाहिराती करत होतो. पण मला काही संघटना आणि व्यक्तींनी निवेदन दिलं. त्यानंतर मी जाहिरातीत काम करणे थांबवलं आहे. तसेच मी आयुष्यात पुढे ऑनलाईन जाहिरात करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे'.

धाराशिवात विद्यार्थ्यांच्या छत्र्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांचा डल्ला

धाराशिवात विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आणलेल्या छत्र्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांनीच डल्ला मारला. धाराशिव येथील वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी छत्र्या आणल्या होत्या. या छत्र्या मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड पाहायला मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. पालकमंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांसोबत फोटोसेशन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्र्या पळवल्या. युवासेनेकडूनच छत्री वाटपाचे नियोजन करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT