Actor Sivaji Appears Telangana State Commission For Women Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Apologised: महिला आयोगासमोर प्रसिद्ध अभिनेत्याने मागितली माफी; महिलांच्या कपड्यांवर केली होती 'ही' अश्लील कमेंट

Actor Apologised: दक्षिणात्य अभिनेता शिवाजीने राज्य महिला आयोगासमोर हजर झाला आणि म्हणाला की तो त्याची चूक पुन्हा करणार नाही. त्याने केलेले विधान त्याने माफी मागितली.

Shruti Vilas Kadam

Actor Apologised: एका चित्रपट कार्यक्रमात महिलांबद्दलच्या "अश्लील" कमेंटबद्दल चौकशीसाठी बोलावल्यानंतर तेलुगू अभिनेता शिवाजी शनिवारी, २७ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील तेलंगणा राज्य महिला आयोगासमोर हजर झाला. आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्याने महिलांबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली आणि आपली चूक मान्य केली.

आयोगाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, शिवाजीने कार्यवाहीदरम्यान माफी मागितली आणि त्याच्या कमेंट चूकीच्या असल्याचे मान्य केले. त्याने पॅनेलला आश्वासन दिले की तो त्याच्या टिप्पण्या पूर्णपणे मागे घेईल आणि भविष्यात त्याच्या भाषणात आणि वागण्यात महिलांचा सन्मान आणि आदर राखेल.

शिवाजीने माफी मागितली

२२ डिसेंबर रोजी ही घटना घडली, जेव्हा तो 'धंडोरा' चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात उपस्थित होता आणि यावेळी त्याने महिलांसाठी चुकीची टिप्पणी केली. दुसऱ्या दिवशी, २३ डिसेंबर रोजी त्याने एक व्हिडिओ शेअर केला आणि माफी मागितली. तो म्हणाला की तो अनवधानाने अस बोलला होता.

शिवाजीने महिलांबद्दल काय म्हटले?

कार्यक्रमात शिवाजी म्हणाले, 'मी सर्व अभिनेत्रींना विनंती करतो की त्यांनी उघड कपडे घालू नयेत. कृपया संपूर्ण शरीर झाकणाऱ्या साड्या किंवा कपडे घाला. कारण सौंदर्य संपूर्ण ड्रेस किंवा साडीमध्ये असते, भौतिक संपत्ती दिसण्यात नाही. लोक उघडपणे काहीही बोलणार नाहीत कारण त्यांना वाटते की ते तुमचे स्वातंत्र्य आहे, परंतु खोलवर त्यांना ते आवडणार नाही.महिला निसर्गासारख्या असतात. जेव्हा निसर्ग सुंदर असतो तेव्हा आपण त्याचा आदर करतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Web Update: WhatsApp झालं पुन्हा अपडेट; व्हॉइस-व्हिडिओ कॉलसाठी घेतलं महत्त्वाचा निर्णय

Ind Vs Nz: पहिल्या टी-२० साठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११; या खेळाडूंना मिळणार संधी

Maharashtra Live News Update: बदलापूरमध्ये भूमाफियांकडून सर्रासपणे डोंगर खोदण्याचं काम सुरू

KDMC Politics: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत राजकीय उलथापालथ, मनसेच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचा महापौर होणार?

Shiv Sena : पुन्हा तारीख पे तारीख; शिवसेना कुणाची? आता या दिवशी होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT