Suhana Khan Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhana Khan: सुहाना खानची हुला हूप स्टेपपाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

Chetan Bodke

Suhana Khan Shah Rukh Daughter The Archies

शाहरुख खानची (Shahrukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan) येत्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. सुहाना खानचा ‘द आर्चीज’ येत्या ७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सध्या सुहानासह चित्रपटाची इतर स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सध्या एका इव्हेंटमधील व्हिडीओमुळे सुहाना चांगलीच चर्चेत आली आहे. सुहानाचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिची थेट राखी सावंतसोबतच तुलना केली आहे.

सध्या चित्रपटातील गाण्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटातल्या ‘वा वा बुम’ गाण्यावर सर्व स्टारकास्ट थिरकली होती. सुहानाच्या हुला हूपच्या स्टेपने उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र त्या व्हिडीओमुळे आणि त्या स्टेपमुळे तिला ट्रोलिंगचा सामाना करावा लागला आहे. व्हिडीओमध्ये तिच्यासोबत इतर स्टारकास्ट सुद्धा हुला हूप करताना दिसत आहे. पण सुहानाने केलेल्या स्टेपमुळे तिला ट्रोलर्सने चांगलंच ट्रोल केलं आहे. (Social Media)

‘फिल्मीग्यान’ या पापाराझी इन्स्टाग्राम चॅनलने तिच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. तिच्या ह्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी तिने केलेल्या हुला हूप स्टेपची खिल्ली उडवली आहे. तर एकाने तुझ्यापेक्षा ती राखी तरी बरा डान्स करते गं... असं म्हणत तिचे कौतुक केले. तर एकाने ‘तू शाहरुखची मुलगी आहे म्हणून काहीही करायचं का? आणि कोणत्याही गोष्टींचं नेटकऱ्यांनी कौतुक करावं का?’ असा सवाल उपस्थित केला. (Trolled)

‘द आर्चीज’च्या प्रमोशनदरम्यान सुहाना खान हिरव्या रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसली होती, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. व्हायरल व्हिडीओमध्ये सुहाना रिंगमध्ये, हुला हूप स्टेप करताना दिसत आहे. सुहाना खानला पहिल्यांदाच स्टेजवर हुलाहूप करताना पाहून लोक तिच्या टॅलेंटचे खूप कौतुक करत आहेत. या इव्हेंटमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

झोया अख्तर दिग्दर्शित चित्रपटामध्ये प्रेक्षकांना मैत्री, प्रेम, ब्रेकअप, धमाल मस्ती आणि काही भावनिक क्षण दिसणार आहे. चित्रपटाचे म्युझिकही प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेणारे आहे. चित्रपटामध्ये सुहानासोबत, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, वेदांग मेहरा, मिहीर अहुजा, युवराज मेंडा आणि आदिती डॅट यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘द आर्चिज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून येत्या ७ डिसेंबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे. (Social Media)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

SCROLL FOR NEXT