Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: इंदिरा गांधींसोबत काय झालं होतं आठवतंय ना? कंगना रणौत मारहाण प्रकरणावर शबाना आझमींची प्रतिक्रिया

Shabana Azmi On Kangana Ranaut Slapping Incident: ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी कंगणा रणौत यांच्या मारहाण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंगना रणौत यांच्यासोबत झालेल्या कृत्याचा निषेध केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री कंगना रणौत निवडून आल्या आहेत. त्यानंतर कंगना रणौत चर्चेत आहेत. ६ जून रोजी दिल्लीवरुन मंडीला जात असताना एका सीआयएसएफ कॉन्स्टेबल महिलेने कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीदेखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

अभिनेत्री शबाना आझमी यांनी सांगितले की, 'कंगना यांच्यासोबत झालेल्या घटनेचा मी तीव्र निषेध करत आहेत. कंगना रणौत या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्या देशाची सेवा करणार आहेत. तुम्ही त्यांच्या मताशी सहमत नसणे हे अगदी स्वाभाविक आहे. परंतु अशा प्रकारे हिंसा करणे अमान्य आहे. लोकशाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा कायदा हातात न घेता काम करणे'.

शबाना आझमी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचं उदाहरण दिले. इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्याच सुरक्षारक्षकाने हल्ला केला होता. त्याच्याबद्दल बोलताना शबामा आझमी यांनी सांगितले की, 'आम्ही आमच्या सुरक्षारक्षकांवर खूप विश्वास ठेवतो. जर त्या विश्वासाचा भंग झाला तर खूप वाईट होऊ शकतं. असंच इंदिरा गांधी यांच्यासोबत झाले होते. कोणत्याही प्रकारचे भाष्य सीआयएसएफ कर्मचाऱ्याच्या कृतीचे समर्थन करू शकत नाही. त्यात ती व्यक्ती खाकी वर्दीत असताना', असं शबाना आझमी यांनी सांगितले. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

कंगना रणौतसोबत घडलेल्या घटनेबद्दल बॉलिवूडमधून तीव्र निषेध केला जात आहे. रवीना टंडन, मिका सिंग, अनुपम खेर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT