Santosh Juvekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकरचं गोविंदा पथकांना आवाहन, म्हणाला...

अभिनेता संतोष जुवेकरने दहीहंडीचा उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांना आवाहन केलं आहे. त्याचा व्हिडिओही त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या श्रावण महिना सुरू आहे. यामुळेच सर्वत्र सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. सामान्य नागरिकांपासून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी संणाचा आंनद घेत आहेत. नुकताच रक्षाबंधन, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला. आता काही दिवसांवर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आला आहे. दहीहंडी(Dahi Handi) म्हटलं की, सर्वांच्या आनंदाला पारावार उरत नाही. मुंबई, ठाण्यात तर हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. उंच मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडली जाते. हा सण परंपरेप्रमाणे साजरा व्हायला हवा, असं अनेक सेलिब्रिटींचंही मत आहे. अभिनेता संतोष जुवेकरने(Santosh Juvekar) दहीहंडीचा उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांना आवाहन केलं आहे. त्याचा व्हिडिओही त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अनेकदा तो राजकीय - सामाजिक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतो. आता दोन दिवसांवर दहीहंडीचा उत्सव जवळ आला आहे. संतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी मानवी मनोरे रचले आहेत. व्हिडिओमध्ये त्याने दोन दिवसांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. मागील दोन वर्षे कोविडच्या संकटामुळं दहीहंडीचा हा उत्सव साजरा करता आला नाही, परंतु यंदा उत्सवाचा जोर आणि जोश काही औरच असणार आहे. सर्व गोविंदा आणि गोपिकांचा दहीहंडी फोडण्याचा कसून सराव सुरू आहे

'कालच माझे खूप जवळचे मित्र मनोज चव्हाण दादांमुळे महाराष्ट्रातल्या गाजलेल्या जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी ह्यांचा सराव बघण्याची संधी मिळाली. "क्या बात मित्रांनो आणि मैत्रिणींनो... जोमात आहात सगळे तुम्ही." एक क्षण वाटलं आपण पण घुसावं पण इतकं सोपं नाही, ते लगेच जाणवलं,' अशी कॅप्शन त्याने पोस्टमध्ये लिहिली आहे.

संतोष जुवेकरने व्हिडिओच्या माध्यमातून गोविंदा पथकांना शुभेच्छा देत विनंती देखील केली आहे. त्याने म्हटलं की, "माझ्या तुम्हाला आणि सगळ्या गोविंदा पथकांना खूप खूप शुभेच्छा आणि एक विनंती मित्रांनो, कृपा करून स्वत:ची आणि तुमच्यासोबत येणाऱ्या मुलींची आणि लहान मुलांची काळजी घ्या. दहीहंडी हा सण आहे आपला. तो सणासारखाच साजरा करा. त्याची स्पर्धा करू नका. मज्जा करा पण काळजी घ्या," असे कळकळीचे आवाहन त्याने केले आहे.

वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डार्लिंग्ज चित्रपटात संतोष जुवेकर दिसला होता. चित्रपटात त्याने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चाहत्यांनी कौतुकही केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही; CM फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम|VIDEO

Bhandara : शाळेत जाताना विद्यार्थिनीवर काळाची झडप; चिखलात सायकल स्लिप होताच ट्रॅक्टरची धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Nagpur Food : नागपूरच्या अशा Top 8 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Kolhapuri Chappal: सहज ओळखता येणार कोल्हापुरी; कोणी-कुठे बनवली चप्पल तेही कळणार

भावंडं खेळत होती, नराधमानं बागेत नेलं, १० वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT