Ram Charan And Dhoni Meets Instagram
मनोरंजन बातम्या

Ram Charan And Dhoni Meets: मुंबईत येताच रामचरणने घेतली महेंद्र सिंग धोनीची भेट, ‘धोनीला भेटून खूप आनंद झाला...’ म्हणत केला आनंद व्यक्त

Ram Charan And Dhoni Photos: सोशल मीडियावर रामचरण आणि महेंद्र सिंग धोनीच्या भेटीचे फोटो व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Ram Charan And Dhoni Meet Photos

रामचरणच्या आरआरआर (RRR) चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला मिळते. या गाण्याने फक्त देशातल्याच नाही तर, जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यानं (Natu Natu Song) गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Award) आणि ऑस्कर पुरस्कारावर (Oscar Award) आपलं नाव कोरलं आहे. सध्या सोशल मीडियावर रामचरणची प्रचंड चर्चा सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर रामचरण आणि महेंद्र सिंग धोनीच्या भेटीचे फोटो व्हायरल होत आहे. त्या दोघांनाही एकत्र पाहिल्यामुळे चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

काल आरआरआर फेम रामचरण मुंबईमध्ये आला आहे. रामचरण मुंबईमध्ये येताच त्याने मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. यावेळी अभिनेत्याने काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान करत अनवाणी येत दर्शन घेतले. यावेळी अभिनेत्याला पाहण्यासाठी मंदिर परिसरात चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्याच्या ४१ दिवसांच्या अयप्पा दीक्षेची सांगता झाल्याची सध्या चर्चा होते. सोशल मीडियावर दर्शनाचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

त्यासोबतच सध्या सोशल मीडियावर रामचरण आणि क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो व्हायरल होत आहे. RRR फेम राम चरणने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा आणि क्रिकेटर धोनी सोबतचा फोटो शेअर केलाय. यामुळे सध्या सोशल मीडियावर रामचरण आणि धोनी हे दोघेही एकत्र दिसल्यामुळे कोणत्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार का?, याची चर्चा होत आहे.

रामचरणने फोटो पोस्ट करताना कॅप्शन दिले की, "भारताचा अभिमान महेंद्रसिंग धोनीला भेटून खूप आनंद झाला," असे राम चरणने लिहिले. या दोघांच्याही फोटोची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. भेटीदरम्यान रामचरणने हिरव्या रंगाचे शर्ट आणि पँट परिधान केलेले आहे. तर धोनीने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि नाईट पँट परिधान केली आहे. राम चरणच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर, गेमचेंजर या चित्रपटामध्ये रामचरण दिसणार आहे. चित्रपट हा एक पॉलिटीकल थ्रिलर चित्रपट असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT