Srikanth Film Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Srikanth Film : श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना भावला, राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक

Srikanth Film 2nd Day Collection : श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास ‘श्रीकांत’ चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. श्रीकांत बोला हे दृष्टीहीन आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे.

Chetan Bodke

श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास ‘श्रीकांत’ चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. श्रीकांत बोला हे दृष्टीहीन आहेत. बोलंट इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यासोबतच ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्समधील ते पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी आहे. त्यांचा बायोपिक नुकताच बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. त्यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केलेले आहे. सध्या चित्रपटाचे प्रेक्षक कौतुक करीत असून चाहत्यांना चित्रपटाची कथा प्रचंड भावलेली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे जोरदार कौतुक केले जात आहे.

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने नुकतंच चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केलेला आहे. चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत ६. २५ कोटींची कमाई केलेली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी २.२५ कोटी तर शनिवारी ४ कोटींच्या आसपास कमाई केलेली आहे. सध्या चित्रपटाचे प्रेक्षक जोरदार कौतुक करीत आहेत. राजकुमारच्या चित्रपटाला प्रेक्षकाकंडून उत्तम प्रतिसाद मिळत असून त्याच्या अभिनयाचंही सर्वत्र कौतुक होत आहे. दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन अगदी उत्तम केलं असून चित्रपटात त्याच्या आयुष्यातील संघर्ष त्यावर त्याने केलेली मात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

श्रीकांत बोला यांचा हा जीवनप्रवास केवळ दृष्टिहिनांसाठीच नाही तर डोळस व्यक्तींसाठीही प्रेरणादायी आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत राजकुमार रावसोबत ज्योतिका, शरद केळकर, आलया एफ आणि जमील खानही आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमारने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट विकेंडला अर्थात रविवारी कशी कमाई करतोय, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपट सध्या अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करत असल्यामुळे प्रचंड प्रकाशझोतात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT