मुंबई: भारतातील भव्य-दिव्य सिनेमा 'बाहुबली'चे दिग्दर्शक एस एस राजमौली आपल्या सर्वांना माहीत आहेत तर मराठी चित्रपटांचा राजमौली म्हणून ओळख असणारे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी सध्या सोशल मीडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या चित्रपटांमधून गावाकडच्या आणि शेतीच्या प्रश्नांवरती लक्ष वेधणारा अभिनेता अशी देखील तरडे यांची ओळख आहे.
तरडेंबद्दल एवढी माहिती देण्याचं कारण म्हणजे सध्या प्रवीन तरडे यांनी त्यांच्या शेतात काम करतानाचा एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर (Social Media) केला आहे. या व्हिडीओमुळे आपल्या चित्रपटांमधून ज्या प्रकारे ते प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात त्याचं प्रकारे त्यांनी या व्हिडीओमधून सर्वांची मन जिंकून घेतली आहेत.
पाहा व्हिडीओ -
शेती विकायची नसते राखायची असते'
फेसबुकवर (Facebook) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रवीण तरडे हे शेतात राबताना दिसत आहेत. तर 'काळ्या मातीत मातीत..' हे गाणं देखील मागे वाजत आहे. त्यामुळे 'शेती विकायची नसते राखायची असते' हा आपल्या सिनेमांमधून मारलेला डायलॉग तरडे प्रत्येक्षात जगत असल्याचं दिसत आहे.
शिवाय हा व्हिडीओ अपलोड करताना 'हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात .. कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू ..' असं कॅपशन देखील दिलं आहे. त्यामुळे खरोखर तरडे हे यशाचा शिखरावर पोहचले असले तरी त्यांची मातीशी असणारी नाळ तुटली नसल्याचं त्यांचे चाहते म्हणत आहेत.
प्रवीण तरडे यांचा नुकताच 'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं आहे. शिवाय आपल्या बोलण्याच्या वेगळ्या शैलीमुळे देखील तरडे ओळखले जातात. नुकतंच त्यांनी पुण्यातील एका बैलगाडा शर्यती दरम्यान आपण बैलगाडा शर्यतीबाबतचा एक भन्नाट चित्रपट (Film) काढणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय यासाठी चक्क बैलांच्या पायात कॅमेरा लावणार असल्याचं ते बोलले होते. त्यामुळे तरडे यांचे शेती आणि शेती संदर्भात असणारं प्रेम सतत दिसून येत असतं.
कोण आहेत प्रवीन तरडे ?
मराठी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता पुण्यातील (Pune) मुळशी गावचे सुपुत्र अशी ओळख असणारे प्रवीण तरडे आपण पेशाने शेतकरी असल्याचं सांगतात, शिवाय ते अजूनही आपल्या गावाकडे असणारी शेती करण्यासाठी गावाकडे जातात काही दिवसांपुर्वी त्यांनी आपल्या वडिलांसोबत काम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होका.
आवड म्हणून चित्रपट व्यवसायाची निवड तरडेंनी केली. पुण्यामध्ये एकांकीका,नाटक लेखनातून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरवात त्यांनी केली आहे. चक वकिलीचे शिक्षण घेतल. सुरुवातीला अग्निहोत्र, कुंकू सारख्या मालिकांचे लेखन त्यांनी केलं. तर सुप्रसिद्ध 'देऊळ बंद' हा स्वामी समर्थांवरील पहिला चित्रपटाचं पहिलं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.