Famous Actor Death  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Passed away : सिनेसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे.

अभिनेत्याने वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचे निधन झाले.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. 'Days of Our Lives' या सीरिजमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेते पॅट्रिक मुल्डून (Patrick Muldoon) यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. अभिनेत्याने वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कलाकारांनी पॅट्रिक मुल्डून यांच्यावर श्रद्धांजली वाहिली.

Deadline च्या वृत्तानुसार, अभिनेत्याचे निधन हॉर्ट अटॅकमुळे झाले. पॅट्रिक मुल्डून यांचा जन्म २७ सप्टेंबर १९६८ रोजी लॉस एंजेलिस येथे झाला होता. खेळाची विशेष आवड असल्याने ते लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्रात रमले आणि त्यांनी ‘USC’ (युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया) साठी फुटबॉल खेळले. ‘Rose Bowl’ स्पर्धा जिंकणाऱ्या दोन संघांचा ते एक भाग होते. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वीच आपल्या कणखर आणि उत्साही वृत्तीसाठी ते ओळखले जात असत. पुढे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि हळूहळू आपली कारकीर्द घडवली.

'Days of Our Lives' या सीरिजमध्ये अभिनेत्याने 'Austin Reed' ही भूमिका साकारल्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. ही भूमिका साकारणारे ते पहिलेच अभिनेते होते आणि त्यांनी १९९२ ते १९९५ या काळात या सीरिजमध्ये काम केले. अनेक वर्षांनंतर, २०११ ते २०१२ या कालावधीत ते पुन्हा एकदा या सीरिजमध्ये परतले. त्यांना पडद्यावर पाहणे प्रेक्षकांना खूप आवडत असे. या भूमिकेमुळे ते अनेक घरांमध्ये एक ओळखीचा चेहरा बनले.

पॅट्रिक मुल्डून यांनी अनेक सीरिज आणि चित्रपटांमध्येही काम केले. यामध्ये 'Melrose Place’, 'Saved by the Bell' आणि 'Who’s the Boss?' यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी 'Starship Troopers', 'Super Troopers' आणि 'Saving Christmas' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ते अनेक वर्षे मनोरंजन क्षेत्रात सतत सक्रिय राहिले. पॅट्रिक यांच्या पश्चात त्यांची जोडीदार मिरियम रोथबार्ट, त्यांचे आई-वडील, त्यांची बहीण आणि तिच्या कुटुंबाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ, सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Nandurbar : BA पास तरुण करायचा महिलांची प्रसूती, बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; असा अडकला जाळ्यात

Kidney Detox Drinks: किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 घरगुती ड्रिंक, रोज प्यायल्यास मूत्रपिंड होईल स्वच्छ

क्रिकेटच्या मैदानात राडा घालणारा श्रेयस अय्यर आहे जादूगार! 52 पत्त्यामधून नेमका काढला बदामचा एक्का, व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अन् पेन्शन कितीने वाढणार? वाचा नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT