अभिनेता करण मेहराच्या अडचणीत वाढ, दुसरा गुन्हा दाखल Saam Tv
मनोरंजन बातम्या

अभिनेता करण मेहराच्या अडचणीत वाढ, दुसरा गुन्हा दाखल

निशाने करणवर इच्छे विरुद्ध अत्याचार केल्याचे आरोप लावत गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई -  प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण मेहराच्या Karan Mehra अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. निशा रावलने Nisha Rawal करणवर दुसरा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा करणवर निशाने घरगुती वादाप्रकरणी आरोप लावत गुन्हा दाखल केला होता. निशाने करणवर इच्छे विरुद्ध अत्याचार केल्याचे आरोप लावत गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये Police Station गुन्हा दाखल केला आहे. Actor Karan Mehra's difficulty increases

तसेच कारणसोबत निशाने बेला मेहरा, अजय मेहरा आणि कुणाल मेहरा या तिघांवर मारहाण आणि त्रास दिल्याचे आरोप लावले आहेत. इतकंच नाही तर बँक अकाउंटमधून करणने तब्बल  १ कोटी १२ लाख २२ हजार २३३ रुपयांची रक्कम काढल्याचे आरोप देखील तिने केला आहे. त्यामुळे करणच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

हे देखील पहा -

करणने तब्बल ७ वर्ष करण ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. यात त्याने नैतिक सिंघानियाची भूमिका साकारली होती. शोमध्ये तो हिना खान सोबत दिसला. करण मेहरा या शोमधून प्रचंड हिट ठरला होता. त्यानंतर करण बिग बॉस १० मध्ये दिसला होता. २०१२ साली निशा आणि करणचे लग्न झाले होते. यानंतर, २०१७ मध्ये या दोघांना एक मुलगा झाला. Actor Karan Mehra's difficulty increases

याआधी निशाने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, करणचे दिल्लीमधील एका मुलीशी अफेयर सुरु आहे. करणला आता तिच्याबरोबर राहायचे आहे. अनेक महिन्यांपासून तो चंदीगडमध्ये शूटिंग करत होता.आता त्याने काबुल केले आहे की त्याचे एका मुलीशी संबंध आहे. ज्यामुळे त्याला घटस्फोट हवा आहे. पण ३१ मेच्या रात्री आमच्यात वाद झाला आणि त्याने माझे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर माझ्या कपाळातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतरच मी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT