Karan Kundrra And Tejasswi Prakash Viral Video Instagram @tejasswiprakash
मनोरंजन बातम्या

Karan Kundrra And Tejasswi Prakash Video: करण- तेजस्वीचा ‘तो’ रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

Viral Video: टीव्ही विश्वातील क्यूट कपल म्हणजे अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते.

Chetan Bodke

Karan Kundrra And Tejasswi Prakash Viral Video

टीव्ही विश्वातील क्यूट कपल म्हणजे अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. या दोघांच्याही लव्हस्टोरीची सुरुवात ‘बिग बॉस १५’ च्या घरातून झाली होती. बिग बॉसच्या घरात करण आणि तेजस्वी यांच्यात आधी मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये होतानाचा प्रवास अनेकांनी पाहिला आहे.

करण आणि तेजस्वीची जोडी कायमच चाहत्यांना भावते. काही दिवसांपूर्वी करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशसोबत गोव्यामध्ये दणक्यात वाढदिवस साजरा केला. त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. अशातच आता सध्या सोशल मीडियावर त्यांच्या ट्रीप दरम्यानचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये करण आणि तेजस्वी या दोघांचाही रोमँटिक अंदाज पाहायला दिसत आहे. नेमका हा व्हिडीओ कुठला आहे?, हे काही समजू शकलेलं नाही. करण आणि तेजस्वीची हा व्हिडीओ @tellychakkar या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला असून त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्वी आणि करण हे दोघेही एकमेकांसोबत मराठीमध्ये बोलताना दिसत आहे. दोघांच्याही या अस्खलित मराठीची प्रचंड चर्चा होत आहे.

व्हिडीओमध्ये, तेजस्वी आणि करण दोघेही एकमेकांना ‘इकडे ये’ असं म्हणताना दिसत आहेत. व्हिडीओतल्या रोमँटिक अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधले. या व्हिडीओवर चाहत्यांकडून हजारो लाईक्स मिळले असून अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. खरंतर तेजस्वी प्रकाश मराठी भाषिक आहे. अनेकदा करणला तिने मराठी भाषेचे धडे दिल्याचे व्हिडीओही आपण पाहिले असतील. त्यांचे व्हिडीओही चर्चेत आले आहेत.

करण कुंद्राच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, ‘तेरे इश्क में घायाल’मध्ये रीम शेख आणि गश्मीर महाजनीसोबत दिसला होता. तेजस्वी प्रकाशने नुकताच तिचा शो ‘नागिन ६’ पूर्ण केला. तर करण कुंद्राने नव्या व्यवसायाला सुरूवात केली आहे. त्याने दिल्लीमध्ये जिम सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

SCROLL FOR NEXT