Actor hiran chatterjee second marriage to model ritika giri daughter niyasa breaks down Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Second Marriage: अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, 19 वर्षांच्या मुलीला सोशल मीडियावरून समजलं; रडत म्हणाली, 'एक मुलगी म्हणून...'

Actor Second Marriage: बंगाली अभिनेता हिरन चॅटर्जी यांच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मुलीला सोशल मीडियावरून मिळाल्यानंतर ती रडू लागली. वडिलांच्या कथित बेकायदेशीर दुसऱ्या विवाहावर मुलगी नियासाने व्यक्त केल्या भावना.

Shruti Vilas Kadam

Actor Second Marriage: बंगाली अभिनेता आणि भाजप आमदार हिरन चॅटर्जी यांच्या वैयक्तिक आयुष्यात एका मोठ्या वाद सुरु झाला आहे. हिरनने वाराणसी येथे मॉडेल आणि फिटनेस इन्फ्लुएंसर रितिका गिरी हिच्याशी दुसरे लग्न केले. ज्याचे फोटो त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर मोठा वाद सुरु झाला आहे. या लग्नाबद्दल त्यांच्या पहिल्या पत्नी अनिंदिता चॅटर्जी आणि त्यांच्या १९ वर्षांच्या मुलगी नियासा चॅटर्जी यांनी धक्का बसला आहे.

अनिंदिताने दावा केला आहे की हिरन आणि ती अजूनही लग्नात आहेत आणि त्यांनी कोणताही घटस्फोट घेतलेला नाही, त्यामुळे हे दुसरे लग्न गैरकायदेशीर आहे. त्यांनी हिरन आणि रितिकाच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे आणि हिरनवर मानसिक आणि भावनिक छळाचे आरोपही केले आहेत.

या संपूर्ण परिस्थितीत नियासा खूप भावनिक झाली आहे. तिला ही बातमी त्यांच्या वडिलांकडून नव्हे तर सोशल मीडियावरून समजली. नियासाच्या म्हणण्यानुसार, ती कॉलेजमधून परत येत असताना तिच्या मित्रांनी वडिलांच्या लग्नाचे फोटो पाठवले आणि मग तिने ते पाहिले. यावर ती म्हणाली, “एक मुलगी म्हणून मला काय बोलावे, मला काहीच समजतं नाही. मला सोशल मीडियावरून हे समजलं. वडील म्हणून ते पूर्णपणे अपयशी ठरलेत.” असे म्हणतं ती रडत म्हणाली.

नियासाने पुढे सांगितले की तिची आई तिच्यासाठी फक्त आई नाही तर तिचे वडील देखील आहे, आणि तिने तिच्या आईसाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक रील पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने तिच्या आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की तिची आई तिच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५० पर्यंत अंक मोजता येईना, बापाचं डोकं सटकलंं, रागाच्या भरात लेकीला मार-मार मारलं अन्....

WhatsApp Update: QR कोड आणि 6 डिजिट PIN; आता मुलांच्या WhatsAppवर राहील पालकांची नजर; मेटानं आणलं नवं फीचर

Date Benefits: दररोज दोन खजूर खाल्ल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Vastu Tips: घरात सतत पैशांची चणचण भासतेय? मग या 5 वास्तू टिप्स नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्हा नियोजनमधील अखर्चित निधीवरून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

SCROLL FOR NEXT