Actor Emraan Hashmi Instagram
मनोरंजन बातम्या

Emraan Hashmi Birthday: इमरान हाश्मीला बॉलिवूडचा ‘सिरियल किसर’ का म्हणतात, तुम्हाला माहितीये का?

Chetan Bodke

Emraan Hashmi Birthday

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आज आपला ४५वा वाढदिवस साजरा करत आहेत. इमरानने आपल्या करिअरची सुरुवात ‘फुटपाथ’ या चित्रपटाने केली होती. मात्र, ‘मर्डर’ आणि ‘गँगस्टर’सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली आहे. इमरानची बॉलिवूडमध्ये ‘सिरियल किसर’ नावाने ओळख आहे. आज आपण इमरानच्या वाढदिवसाबद्दल त्याच्या लाईफविषयी जाणून घेणार आहोत. (Bollywood)

इमरान हाश्मीचा जन्म २४ मार्च १९७९ रोजी झाला होता. त्याचे वडील सय्यद अन्वर हाश्मी हे व्यापारी आहेत, त्यांनी 'बहारों की मंझिल' (1968) चित्रपटात छोटी भूमिका केलेली होती. तर इमरानचे आजोबा सय्यद शौकत हाश्मी हे पेशाने पत्रकार होते, सोबतच ते चित्रपट दिग्दर्शकही होते. इमरान हाश्मीची आजी मेहराबानो या अभिनेत्री होत्या. महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांची आई शिरीन मोहम्मद अली यांची मेहराबानो बहीण होत्या. इमरानचे निर्माते महेश भट्ट नात्याने मामा होते. (Bollywood Actor)

इमरान हाश्मीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेय की, "तो शाळेमध्ये खूप मस्तीखोर होता. पण मुलींसोबत बोलण्यासाठी लाजायचा. पण नंतर तो शांत झाला." इमरान हाश्मीने 'आपकी अदालत'मध्ये सांगितले होते की, "कॉलेजमध्ये असताना त्याच्या वडिलांना त्याच्या करियरबद्दल खूप काळजी वाटायची. इमरानला आपल्याला करियरमध्ये काय करायचे, हे माहित नव्हते. इमरानच्या वडिलांनी इमरानची कशी कारकीर्द घडवायची ही जबाबदारी निर्माते महेश भट्ट यांच्यावर दिली होती. कारण ते त्याचे मामा होते."  (Bollywood Film)

निर्माते महेश भट्ट यांनी इमरान हाश्मीला २००३ मध्ये 'फुटपाथ' चित्रपटातून लॉन्च केले. हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि त्यानंतर त्याला मुंबईतील एका ॲक्टिंग स्कुलमध्ये पाठवले. तो ॲक्टिंग शिकत असताना, महेश भट्टने 'मर्डर' चित्रपट बनवण्याची तयारी केली होती.

तेव्हा महेश भट्ट यांनी पु्न्हा एकदा त्याला या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच करण्याचे ठरवले. हा चित्रपट इमरान खास ठरला. या चित्रपटातूनच त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. इमरान आणि मल्लिका शेरावतचे या चित्रपटामध्ये बोल्ड सीन्स होते. हा चित्रपट बॉलिवूडमधील पहिला बोल्ड चित्रपट ठरला होता. (Bollywood News)

'आशिक बनाया आपने', 'जन्नत', 'गँगस्टर', 'द किलर', 'जेहर', 'क्रूक' आणि 'गुड बॉय बॅड बॉय' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दिलेल्या किसींग सीन्समुळे त्याला 'सिरियल किसर' असे नाव पडले. इमरान हाश्मीने जवळपास प्रत्येक चित्रपटात किसिंग सीन दिले आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT