Parthasarathi Deb Passed Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे एका दुर्धर आजाराने निधन, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाहिली श्रद्धांजली

Parthasarathi Deb Dies: ज्येष्ठ बंगाली अभिनेते पार्थसारथी देब यांचे निधन झाले आहे. त्यांचे वयाच्या ६८व्या वर्षी कोलकात्यात निधन झाले आहे.
Parthasarathi Deb Passed Away
Parthasarathi Deb Passed AwaySaam Tv

Parthasarathi Deb Dies

बंगाली सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ बंगाली अभिनेते पार्थसारथी देब यांचे निधन झाले आहे. त्यांचे शुक्रवारी वयाच्या ६८ व्या वर्षी कोलकात्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पार्थ यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह बंगाली सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पार्थ यांच्या निधनामुळे बंगाली सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतही शोककळा पसरली आहे.

Parthasarathi Deb Passed Away
Hemangi Kavi Reel: 'हेमांगी कवीच्या डोळ्यांना नेमकं काय झालंय ?'; रिल पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११:५० वाजता पार्थ सारथी यांचे निधन झाले आहे. पार्थ सारथी यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या अनेक दिवसांपासून COPD संबंधित आजाराने ग्रस्त होते. काही दिवसांपूर्वी पार्थ यांना सरकारी एमआर बांगूर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यातच त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

"प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता पार्थच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. त्यांचे अचानक जाणे सर्वांनाच दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात मी सुद्धा सामील आहे." अशी प्रतिक्रिया, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. पार्थ यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, त्यांनी अनेक बंगाली चित्रपट आणि मालिकेंमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.

Parthasarathi Deb Passed Away
Mahaparinirvan: 'महापरिनिर्वाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com