Kantara Movie Prequel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kantara Movie Prequel: कांतारा 2 येणार? ऋषभ शेट्टीने दिली चित्रपटाविषयी मोठी अपडेट

Rishabh Shetty Post: ऋषभ शेट्टीने 'कांतारा २'ची मोठी अपडेट शेअर केली आहे.

Pooja Dange

Kantara 2 Movie: कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने फक्त भारतातच नाहीत जगभरात वाह वाह मिळवली. आता या चित्रपटाच्या पुढच्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. प्रेक्षक कांतारा २ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ऋषभ शेट्टीने 'कांतारा २'ची मोठी अपडेट शेअर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ऋषभने चित्रपटाविषयी माहिती दिली आहे.

हॉम्बले फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, लेखनाची सुरुवात... उगदी आणि नवीन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर, आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की कंताराच्या दुसऱ्या भागाचे लेखन सुरू झाले आहे. निसर्गाशी असलेले आमचे नाते दर्शवणारी आणखी एक आकर्षक कथा तुमच्यासाठी आणण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही. अधिक माहितीसाठी संपर्कात रहा.

तर त्यांची ही पोस्ट शेअर करत ऋषभ शेट्टीने देखील यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, उगदी सणाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी उगदी ! कांतारा लेखन सुरू!

ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनय कांतारा हा चित्रपट भारतीय संस्कृतीशी जोडलेला आहे. ऋषभाला गावाकडे, गावाच्या मातीतले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत घेऊन जायचे आहेत. कांतारा हा चित्रपट १६ कोटीच्या बजेटमध्ये बनला आहे. कन्नड भाषेतील हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. त्यानंतर हिंदी आणि तेलगू भाषेत त्याचे भाषांतर करण्यात आले.

कांतारा भाग एक हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT