Chirag Patil Interview Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dil Dosti Deewangi: ‘रोमान्स करायला कुणाला आवडत नाही ?’, ‘दिल दोस्ती दिवानगी’चा चिराग पाटील म्हणतो ‘मजा आली...’

Chirag Patil Interview: आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला ॲक्शन भूमिकेच्या माध्यमातून आलोय, पण मी या चित्रपटाच्या माध्यमातून रोमान्स भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलोय.

Chetan Bodke

Chirag Patil Interview

मैत्री म्हणजे काय? कोणासाठी प्रेम, कोणासाठी आधार देणारी यारी, तर कोणासाठी निव्वळ दुनियादारी….!! एकूणच मैत्रीवर भाष्य करणारा आणखी एक चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाचं नाव ‘दिल दोस्ती दिवानगी’ असं आहे. नुकतंच चित्रपटाच्या टीमने ‘साम टिव्ही’सोबत संवाद साधला आहे, यावेळी चित्रपटाच्या टीमने एकंदरीतच आपल्या भूमिकेविषयी, चित्रपटाच्या कथेबद्दल भाष्य केलं आहे.

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग या नव्या दमाच्या तरुण कलाकारांची फळी यात पहायला मिळतेय. सोबत प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी, सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी आणि मात्तब्बर कलाकारांची साथ त्यांना मिळाली आहे. (Actors)

चित्रपटाविषयी दिलेल्या मुलाखतीत अभिनेता चिराग पाटील म्हणाला, “मी आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला ॲक्शन भूमिकेच्या माध्यमातूनच आलो आहे. पण या चित्रपटातून माझी एक वेगळीच भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. माझं पात्र निर्मात्यांनी अगदी व्यवस्थित रित्या मांडलेलं आहे. त्या पद्धतीने पात्र साकारताना मला खूपच मज्जा आली. मी आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला ॲक्शन भूमिकेच्या माध्यमातून आलोय, पण मी या चित्रपटाच्या माध्यमातून रोमान्स केलाय. रोमान्स करायला कोणाला आवडत नाही. पण मला या चित्रपटामध्ये भूमिका साकारताना एक वेगळीच मज्जा आली.” (Marathi Film)

मुलाखतीत अभिनेता पुढे म्हणतो, “चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे तर, चित्रपटामध्ये सर्वच वयोगटातले कलाकार आहेत. शुटिंग दरम्यान त्यांच्यासोबत काम करताना आम्ही एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो. चित्रपटात असलेल्या सर्वच कलाकारांची आणि आमची चांगली मैत्री झाली. आम्ही शुटिंग देखील खूप गंमती जंमती करत पूर्ण केली. इतक्या सहजरित्या आम्ही शुटिंग केली.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

SCROLL FOR NEXT