Bharat Jadhav got Upset Because theatre condition in Ratnagiri  Saam TV
मनोरंजन बातम्या

Bharat Jadhav Big Announcement: रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही! भरत जाधव का चिडले?

Bharat Jadhav Natak: रत्नागिरीतील नाट्यगृहाची स्थिती चांगली नसल्याने भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Pooja Dange

अमोल कलये

Bharat Jadhav Will Not Perform In Ratnagiri: अभिनेते भरत जाधव चित्रपटांमध्ये काम करत नसले तरी रंगभूमीवर सक्रिय आहेत. रंगभूमीवर काम करता असताना त्यांना एक खूप वाईट अनुभव आला आहे. रत्नागिरीतील नाट्यगृहाची स्थिती चांगली नसल्याने भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही असे देखील म्हटले आहे.

काल रत्नागिरीत भरत जाधव यांच्या 'तू तू मी मी' या नाटकाचा प्रयोग होता. दरम्यान भरत जाधव यांचा ज्या नाट्यगृहात प्रयोग होता त्या नाट्यगृहातील एससी आणि साऊंड सिस्टिंम नीट काम करत नसल्याने भरत जाधव नाराज झाले आहेत. (Latest Entertainment News)

भरत जाधव यांनी नाट्यगृहाच्या या दुराव्यास्थेबाबत म्हटले आहे की, 'नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही.' एससी नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून एकदा तुम्ही पाहा, अशी कळकळीची विनंती भरत जाधव यांनी प्रेक्षकांना केली. नाट्यगृहाची दुरावस्था असताना प्रेक्षक एवढे शांत कसे राहू प्रेक्षकांना शकता. रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत भारत जाधव यांनी हे जाहीर केले आहे.

भरत जाधव यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रंगमंचावरून भरत जाधव प्रेक्षकांना एका नटाची व्यस्था सांगत आहेत. नाटासाठी नाटक म्हणजे जीव आणि प्राण असतो. अशावेळी जर नाट्यगृहाची दुरावस्था असेल तर किंवा नट काय बोलतो हे प्रेक्षकांपर्यंत पोचणार नसेल तर साहजिक कलाकारांना नाराज होणार.

नाट्यगृहाची दुरावस्था असलेली ही पहिली घटना नाही. आधी देखील प्रशांत दामले आणि सिबोध भावे यांनी व्हिडिओ शेअर करत नाट्यगृहांची वाईट स्थिती दाखवली होती. तसेच नटाला कशा परिस्थितीत काम करावे लागते हे सांगितले होत. कलाकारांचे दुःख सरकारपर्यंत लवकर पोहचेल अशी अपेक्षा करूया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठीण? VIDEO

SCROLL FOR NEXT