Pushpa 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushpa 3: 'पुष्पा 3' या दिवशी होणार रिलीज; अल्लू अर्जुनने स्वतःच दिली हिंट

Pushpa 3 Movie Released Date: पुष्पा चित्रपटाच्या सिक्वेलविषयी अल्लु अर्जुनने नवीन अपडेट दिली आहे.

Manasvi Choudhary

पुष्पा 2 च्या सुपरहिट यशानंतर सर्वत्र पुष्पा 3 ची उत्सुकता लागली आहे. पुष्पा 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. 5 डिसेंबर 2024 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कोट्यावधीचा टप्पा पार केला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. अशातच पुष्पा चित्रपटाच्या सिक्वेलविषयी अल्लु अर्जुनने नवीन अपडेट दिली आहे.

चित्रपटाने केला हजारो कोटींचा टप्पा पार

अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाने जगभरात १००० कोटीचा टप्पा पार केला आहे. चाहत्यांना पुष्पा ३ ची प्रचंड उत्सुकता लागली आहे. पुष्पा 2 पाहतानाच प्रेक्षकांना मोठं सरप्राईज मिळाले ते म्हणजे लवकरच पुष्पा 3 येणार आहे. यामुळेच पुष्पा 3 रिलीज कधी येणार आहे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

पुष्पा 3 चित्रपटाचे नाव काय?

पुष्पा 2 चा शेवटमध्ये पुष्पाचा तिसरा सिक्वेलची माहिती मिळत आहे. पुष्पा द रॅम्पेज असं सिक्वेलचं नाव असणार आहे. आता तिसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे. माहितीनुसार पुष्पा 3 चा सिक्वेल यायला चार ते पाच वर्षे लागतील. यापूर्वी अल्लु अर्जुन त्याच्या उर्वरित प्रोजेक्टवर काम करणार आहे.

पुष्पा 3 मध्ये विजय देवरकोंडा दिसणार?

माहितीनुसार, पुष्पा 3 मध्ये विजय देवरकोंडाची एन्ट्री होणार असं बोललं जात आहे. तिसऱ्या सिक्वेलमध्ये अल्लू अर्जुनसोबत विजय देवरकोंडा अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही यामुळेच पुष्पा 3 मध्ये नेमकं कोण कोण असणाप हे पाहणं महत्वाचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT