Ali Fazal-Richa Chadha Wedding Update
Ali Fazal-Richa Chadha Wedding Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ali Fazal-Richa Chadha Wedding : अली फजल-ऋचा चढ्ढा पारंपरिक पद्धतीनं करणार लग्न, पाहुण्यांची यादी, संगीत...असा आहे प्लान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ali Fazal-Richa Chadha Wedding Update | मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता अली फजल(Ali Fazal) आणि अभिनेत्री ऋचा चढ्ढा(Richa Chadha) येत्या सप्टेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाची तारीख यापूर्वीच ठरली होती. पण कोरोना महामारीमुळे त्यांनी लग्नसोहळा पुढे ढकलला. अली आणि ऋचा सप्टेंबरपूर्वीच त्यांच्या प्रोजेक्ट्सचे सर्व शूट पूर्ण करणार आहेत. माहितीनुसार या कपलचे लग्न सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते.

ऋचा आणि अलीने त्यांच्या टीमला २५ सप्टेंबरनंतर कोणतेही काम घेऊ नये, असे सांगितले असल्याचे वृत्त आहे. एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार, या कपलच्या दोन्ही कुटुंबांव्यतिरिक्त या लग्नात फक्त काही जवळचे लोक सहभागी होणार आहेत. तसेच हे कपल पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. ऋचा आणि अली लग्नाच्या ३ पार्ट्या देणार असल्याचेही वृत्त आहे. एक पार्टी फक्त कुटुंबातील सदस्यांसाठी असेल. तर यानंतर दिल्ली आणि मुंबईत भव्य रिसेप्शन होणार आहे.

या कपलच्या संगीत फंक्शनमध्ये विशेष परफॉर्मन्स असणार आहेत. या कपलला त्यांचा संगीत फंक्शन स्पेशल करायचा आहे. ऋचा चढ्ढा आणि अली फजलने आधीच त्यांच्या जवळच्या मित्रांना लग्नाचे निमंत्रण पाठवले आहे, परंतु अद्याप पाहुण्यांची यादी पूर्ण तयार झाली नसल्याचे बोलले जात आहे. रिसेप्शनला देश-विदेशातील सुमारे ४०० पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अली फजलने ज्यांच्यासोबत काम केले आहे अशा काही हॉलिवूड सेलिब्रिटींचाही या यादीत समावेश आहे.

अली फजल शेवटचा अभिनेत्री गॅल गॅडोट आणि अभिनेता टॉम बेटमनच्या हॉलिवूड सिनेमा 'डेथ ऑन द नाईल'मध्ये दिसला होता. अली सध्या त्याची बहुप्रतीक्षित वेब सीरीज 'मिर्झापूर'-३ च्या तयारीत व्यग्र आहे. तर ऋचा पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीच्या 'हिरामंडी' आणि 'फुकरे ३' मध्ये तिच्या भोली पंजाबनच्या भूमिकेत दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : महाराष्ट्राच्या महानंदवर नॅशनल डेअरीचा ताबा! नेमकं प्रकरण काय?

Jayant Patil : 'कोणाला वाईट वाटत असेल पण मला समाधान वाटलं...'; भरसभेत जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींचे मानले आभार

Special Report : राज ठाकरेंनी मैदान मारलं, मोदींबरोबर एकाच मंचावर होणार 'राज'गर्जना

Maharashatra Election: GST, शेतकरी, आशा सेविकांच्या मानधनावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Special Report : ठाकरेंचा, शिंदेंचा की तिसराच शिलेदार गुलाल उधळणार? अशी आहेत पालघरची राजकीय समीकरणे..

SCROLL FOR NEXT