Aamir Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' संदर्भात मोठी अपडेट, चित्रपटाच्या शूटिंगला केव्हा पासून होणार सुरूवात ?

Sitaare Zameen Par Shooting Update : आमिर खान लवकरच 'सितारे जमीन पर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाच्या शुटिंगबद्दल महत्वाची अपडेट समोर आलेली आहे.

Chetan Bodke

Aamir Khan Sitaare Zameen Par Shoot In Delhi

बॉलिवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) गेल्या काही दिवसांपूर्वी 'सितारे जमीन पर'ची घोषणा केली. आमिर खान लवकरच 'सितारे जमीन पर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाच्या शुटिंगबद्दल महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. चित्रपटाची पुढच्या महिन्यापासून शूटिंग दिल्लीत सुरू होण्याची शक्यता आहे. (Bollywood)

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, आमिर खान 'सितारे जमीन पर' च्या शुटिंगसाठी पुढच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये येणार आहे. त्याच्यासोबत शुटिंगसाठी ११ मुलंही असणार आहेत. आमिरसोबत चित्रपटाचीही स्टारकास्ट असणार का ? अद्याप याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे कथानक पॅरालिम्पिक गॅम्सवर आधारित आहे. चित्रपटाच्या शूटिंगला मे किंवा जून महिन्यापासून दिल्लीमध्ये सुरूवात होणार आहे. दिल्लीतल्या अनेक ऐतिहासिक स्थळांवर चित्रपटाची शुटिंग केली जाणार आहे. (Aamir Khan)

बॉलिवूड अभिनेत्री जेनिलिया डिसूजा आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण असे झाले तर आमिर खान आणि जेनिलिया डिसूझा यांना पहिल्यांदाच पडद्यावर रोमान्स करताना लोकांना पाहायला मिळणार आहे. हा भावनिक आणि मनोरंजक चित्रपट असणार आहे. २००७ मध्ये रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर'च्या थीमवर आधारित चित्रपट असणार आहे. (Bollywood Film)

दरम्यान, आमिर खान २०२२ मध्ये 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात शेवटी दिसला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे आमिरला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला आणि कोणताही प्रोजेक्ट साइन केला नाही. काही दिवसांपूर्वी आमिरने सनी देओलच्या 'लाहोर १९४७' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची चर्चा सुरू असताना आता त्याने 'सितारे जमीन पर' या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT