Ira Khan and Aamir Khan Gets Emotional Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Ira Khan Gets Emotional: आमिर खानची लाडकी लेक लग्नानंतर झाली भावुक, रडतानाचा व्हिडीओ Viral

Ira Khan Gets Emotional Video: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानची लाडकी लेक आयरा खान बुधवारी (१० जानेवारी) उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकली. सध्या तिच्या लग्नातले अनेक फोटो व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Ira Khan Emotional Viral Video

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) बुधवारी (१० जानेवारी) विवाहबंधनात अडकली. आयरा खानने आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने (Nupur Shikhare) उदयपूरमध्ये शाही पद्धतीत लग्नगाठ बांधली.

यावेळी दोघांनीही ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याला दोघांच्या कुटुंबातील जवळचे व्यक्तींसह सिनेसृष्टीतील काही मित्रमंडळीही उपस्थित होते. ईरा- नुपूरच्या लग्नामध्ये अभिनेत्री रिना दत्तानेही हजेरी लावली होती. यावेळी रिना दत्ताच्यासमोर ईरा इमोशनल झालेली दिसते.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. 'व्होम्पला' या इन्स्टाग्राम चॅनलवर ईरा भावुक झालेली व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. यावेळी स्टेजवर अमिर खानसह इतर फॅमिली सदस्यही होते. ईरा भावुक झालेला व्हिडीओ मराठमोळा आणि टॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मेनॉनने काढलेला आहे. हा व्हिडीओ त्याने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही मराठमोळ्या पद्धतीने लग्न करणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. पण त्यांनी लग्नगाठी थेट ख्रिश्चन पद्धतीने बांधल्यामुळे त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओज सध्या व्हायरल होत आहे. लग्नामध्ये आयराने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर नुपूर शिखरेने राखाडी रंगाचा फॉर्मल सूट घातला होता.

नुपूर- ईराने गेल्याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर या दोघांनीही उदयपूरच्या हॉटेल ताज अरावली पॅलेसमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. आता १३ जानेवारी मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये रिसेप्शन होणार आहे. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. रिसेप्शनसाठी ११ नोव्हेंबरला अर्था आज आयरा-नुपूर उदयपूरहून मुंबईला रवाना होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

3 Idiots मधील 'मिलिमीटर' आठवतोय का? तुर्की पत्नीसोबत दिल्लीत दिसला, VIDEO होतोय व्हायरल

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

SCROLL FOR NEXT