अभिषेक बच्चन आणि सैयमी खेर यांचा 'घुमर' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. आर बल्की यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक स्पोर्ट ड्रामा आहे. प्रेक्षक चित्रपटाचा रिव्ह्युव्ह शेअर करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून 'घुमर' चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटच ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक अभिषेक आणि सयामीच कौतुक करत आहे. महिला क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित हा चित्रपट कसा आहे ते जाणून घ्या.
आर. बल्की यांनी या चित्रपटातून एक उत्तम दिग्दर्शक कसा असतो हे दाखवून दिलं आहे. त्यांनी प्रेक्षकांची आवड अचूक जाणली आहे. एका छोट्या कथेची विस्तृत मांडणी करून त्यांनी 'घुमर' चित्रपट साकारला आहे. त्यांच्या दिगदर्शनाला सलाम.
अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या हा चित्रपट महिला क्रिकेटपटूवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सैयामी, अनिना ही भूमिका साकारत आहे. अनिनाने स्थानिक पातळीवर उत्तम क्रिकेट खेळून नाव कमावलेले असते. भारतीय महिला क्रिकेट संघात जाण्याचं तिचं स्वप्न असतं. अनिनाची आजी (शबाना आझमी) आणि तिचे संपूर्ण कुटुंब तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला साथ देत असतं.
अभिषेक बच्चनच्या भूमिकेविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटामध्ये तो पदम सिंग सोधी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. पदम सिंग भारतीय संघाचा माजी खेळाडू होता. पण एका दुखापतीमुळे त्याचे संपूर्ण करियर उद्वस्त झाले. त्यामुळे तो दारूच्या आहारी गेला, तापट झाला. त्याचा स्वभाव खूप विचित्र आहे.
कलाकारांचा परफॉरन्स
अभिषेक बच्चनचा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात बेस्ट परफॉर्मन्स या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याने ही व्यक्तिरेखा स्वतःचा अनुभव असल्यासारखी साकारली आहे. एक अयशस्वी व्यक्ती त्याने उत्तमरीत्या दाखवला आहे.
तर अनिनाचे पात्र साकारणारी सैयमी खेळणे देखील उत्तम अभिनय केला आहे. अभिनयासह तिने तिच्या फिटनेसवर देखील तितकीच मेहनत घेतली आहे.
शबाना आझमी, अभिषेक बॅचचं यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी त्यांनी संपूर्ण ताकदीने केल्या आहेत.
इमोशनल ड्रामा असलेल्या या चित्रपटामध्ये अनेक वेगवेळे पैलू तुम्हाला पाहायला मिळतील. दिग्दर्शकाची कथेची मांडणी, क्रिकेट सामन्याचे सीन्स तुम्हाला खिळवून ठेवतात. तसेच अनेकद टाळ्या आणि शिट्यांचा कडकडाट होतो.
'घुमर' सर्व बाजूंनी दमदार असला तरी बॉक्स ऑफिसवर त्याला संघर्ष करावा लागणार आहे. कारण आधीच बॉक्स ऑफिसवर 'गदर २', 'ओएमजी २' हे चित्रपट आधीच दमदार कमाई करत आहेत. (Latest Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.