Abdu Rozik Instagram @abdu_rozik
मनोरंजन बातम्या

Abdu Rozik: अब्दूच्या जीवनात आलेत प्रेमाचे वारे, बिग बॉसमधून बाहेर पडताच अब्दूचे नशीब चमकले...

टेलिव्हिजनसृष्टीत सर्वाधिक टीआरपी असलेला बिग बॉस सध्या बराच चर्चेत आहे. त्या शो सोबतच त्यातील स्पर्धकही बरेच चर्चेत आहे.

Chetan Bodke

Abdu Rozik: टेलिव्हिजनसृष्टीत सर्वाधिक टीआरपी असलेला बिग बॉस सध्या बराच चर्चेत आहे. त्या शो सोबतच त्यातील स्पर्धकही बरेच चर्चेत आहे. या सीझनमधील प्रत्येक स्पर्धकाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अब्दु रोजिक हे त्यापैकीच एक. अब्दू गेल्या काही दिवसांपुर्वी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. अब्दू रोझीची 'मुर्ती लहान पण किर्ती महान' या उक्तीप्रमाणे त्याचे काम आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, अब्दूने कबूल केले की तो प्रेमात आहे आणि त्याने एक बॉलिवूड चित्रपट साइन केला आहे.

घरातून बाहेर पडल्यानंतरही अब्दुचे वर्चस्व घरात कायम आहे. अब्दू हा शोच्या स्पर्धकांपैकी एक सर्वात प्रिय आणि चर्चेचा विषय होता. शोमधून त्याची अचानक एक्झिट झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का मिळाला आहे. अब्दु रोजिक 'बिग बॉस 16'मध्ये येताच प्रेक्षकांच्या चर्चेत आला, सर्वांचाच लाडका आणि प्रिय म्हणून त्याची ओळख सर्वत्र आहे. कोणत्याही स्पर्धकाला जर 'तुमचा आवडता स्पर्धक कोण?' असे विचारले जाते तेव्हा प्रत्येकजण अब्दूचेच नाव उच्चारतो.

दरम्यान घरातील सदस्य देखील त्याची अनेकदा काळजी घेतानाही दिसले. अनेक प्रसंगी आपण पाहिलं की सलमान खानने अब्दू आणि निमृतच्या मैत्रीची स्तुती केली होती, सोबतच अब्दू निमृतमधील आपुलकीबद्दल आणि प्रेमाबद्दलही अनेकदा उघडपणे बोलताना दिसली. गेल्या काही दिवसांपुर्वी, अब्दू शोमधून ब्रेक घेत घरी परतला होता, त्यावेळी त्याला पुन्हा शोमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले होते. आणि अब्दू चाहत्यांच्या प्रेमाखातर परतला होता.

अब्दूला काही कारणास्तव शो मध्येच सोडावा लागला आणि त्यामुळे त्याचा प्रवास तिथेच संपला. मनीष पॉलच्या शोमधील एका मुलाखतीदरम्यान अब्दूने सांगितले होते की त्याची एक मैत्रीण असून तो तिच्या प्रेमात आहे. परंतु त्याने बिग बॉसच्या घरात काहीही उघड केले नाही कारण त्याला त्याचा खेळ खराब करायचा नव्हता. सोबतच अब्दूने एक बॉलिवूड चित्रपट साइन केला आहे, पण त्याबद्दल त्याने काहीही स्पष्ट केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT