Anu Aggarwal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Anu Aggarwal : "३५ वर्षे झाले अजून मानधन मिळाले नाही", आशिकी गर्लचा धक्कादायक दावा

Anu Aggarwal-Aashiqui : 'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवालने मोठे विधान केले आहे. तिला चित्रपटाचे संपूर्ण मानधन मिळाले नसल्याचा तिने खुलासा केला आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'आशिकी' (Aashiqui ) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटातील गाणी खूपच हिट झाली. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Aggarwal) मुख्य भूमिकेत झळकले. हा चित्रपट 1990 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामुळे अनु अग्रवाल आणि राहुल रॉय यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे.

आता पुन्हा एकदा अनु अग्रवाल चर्चेत आल्या आहेत. त्याच्या एका विधानाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री अनु अग्रवाल यांनी 'आशिकी' चित्रपटाचे पूर्ण मानधन त्यांना मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे. 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत अनु अग्रवाल यांनी हा मोठा खुलासा केला आहे.

अनु अग्रवाल म्हणाल्या की, "'आशिकी' जेव्हा चित्रपट आला तेव्हाच्या काळी इंडस्ट्रीत येणारा पैसा हा अंडरवर्ल्डचा असायचा. कारण इंडस्ट्रीत दाऊद इब्राहिमसारख्या लोकांचे राज्य होते. त्यामुळे मला आजही 'आशिकी' चित्रपटाचे सगळे मानधन मिळाले नाही आहे. ठरवलेल्या मानधनानुसार मला फक्त 60 टक्के पैसे मिळाले आहेत. उरलेले 40 टक्के पैसे अद्याप मिळाले नाही."

पुढे अनु अग्रवाल म्हणाल्या की, "'आशिकी' चित्रपटानंतर मी मॉडेलिंगमध्ये खूप पैसे कमावले. मी अनेक ब्रँड्सची ब्रँड अँबेसिडर देखील होते. ज्यावेळी कोणताही अभिनेता ब्रँड अँबेसिडर नव्हता. आता ठीक आहे की मला ते पैसे नाही मिळाले. मी असे समजते की, मीच त्यांना ते पैसे गिफ्ट म्हणून दिले." अनु अग्रवाल यांच्या या विधानाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनु अग्रवाल सध्या एका सामाजिक कार्यकर्त्याला आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT