Aamir Khan In Kollywood Saam TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Entry South Movie: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट दिसणार साऊथ चित्रपटांमध्ये? एका फोटोंवरून चर्चांना उधाण

Aamir Khan In Tamil Movie: अमीर खान देखील तामिळ चित्रपटामध्ये काम करणार आहे.

Pooja Dange

Aamir Khan Will Play Villain In South Movie:

भारतीय सिनेसृष्टी वेगवगेळ्या भागात विभागलेली आहे. बॉलिवूड, कोलिवूड, टॉलिवूड, भोजपुरी, मराठी इत्यादी. त्यामुळे त्या क्षेत्रातील कलाकार त्याच्या सिनेसृष्टीत काम करण पसंत करायचे. कोविडनंतर मात्र हे गणित बदल्याचं दिसत आहे.

अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये भारतातील विविध सिनेसृष्टीत कलाकारांची एन्ट्री झाली आहे. तसेच बॉलिवूड कलाकार देखील दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीसह इतर भागात काम करत आहेत. आता अमीर खान देखील तामिळ चित्रपटामध्ये काम करणार आहे.

वेंकट प्रभू दिग्दर्शित विजयचा आगामी चित्रपट 'दलापति 68' आणि जयम रवी-स्टारर मोहन राजा दिग्दर्शित 'थानी ओरुवन 2'या चित्रपटाची निर्मिती AGS प्रॉडक्शन करीत आहेत. नुकतीच या चित्रपटांची घोषणा झाली आहे. या चित्रपटातील लीड कलाकारांशिवाय इतर कलाकारांविषयी अद्याप काहीही माहिती रिव्हील करण्यात आलेली नाही.

AGS प्रॉडक्शनच्या ऐश्वर्या कल्पथी यांनी आमिर खानसोबतच एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी नुकतीच आमिर खानला भेटल्याचे सांगितले आहे. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे आमिर खान दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार असल्याचे बोलले जात आहे. AGS प्रॉडक्शनच्या दोन्ही चित्रपटांमध्ये आमिर खान खलनायकाची भूमिका साकरणार आहे, अशी चर्चा आहे.

ऐश्वर्या कल्पथी यांनी आमिर खानचा फोटो शेअर करत लिहिले आहे, 'आमच्या वेळच्या दिग्गज अभिनेत्याला भेटले यावर विश्वास बसत नाहीये.' त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकरी विविध अंदाज लावत आहेत. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात धक्का; माजी मंत्र्यांच्या बंधूंचा तडकाफडकी राजीनामा; पत्रात सांगितली मनातली खदखद

Home Vastu Tips: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

ज्या मुलाला दत्तक घेतलं, त्याच्याच बायकोनं वृद्ध सासूला मध्यरात्री रस्त्यावर सोडलं

Bike Stunt : 'मौत का कुआ'मध्ये स्टंटबाजी करताना भीषण अपघात, तरुण १५ फूट खाली पडला; घटनेचा थरारक Video Viral

Maharashtra Live News Update: लातूरच्या औसा रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला भीषण आग

SCROLL FOR NEXT