Aamir Khan-Rajinikanth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan-Rajinikanth : आमिर खान रजनीकांत यांच्या पाया पडला; 'कुली' ट्रेलर लाँच दरम्यानचा VIDEO व्हायरल

Aamir Khan Touches Rajinikanth Feet : 'कुली' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमिर खान रजनीकांत यांच्या पाया पडताना दिसत आहे.

Shreya Maskar

'कुली' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला आहे.

ट्रेलर लाँचला आमिर खान रजनीकांत यांच्या पाया पडतो.

'कुली' चित्रपटात अभिनेते रजनीकांत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता ही आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आमिर खान साऊथचे सुपस्टार अभिनेते रजनीकांत (Rajinikanth ) यांच्या पाया पडताना दिसत आहे.

नुकताच 'कुली' (coolie ) चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला आहे. या चित्रपटात अभिनेते रजनीकांत आणि आमिर खान एकत्र झळकले आहेत. ट्रेलर लाँच सोहळा चेन्नईमध्ये पार पडला. तेव्हा कार्यक्रम दरम्यानचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रजनीकांत यांना पाहताच आमिर खान त्यांच्या वाकून पाया पडतो. त्यांना नमस्कार करतो. त्यानंतर रजनीकांत आणि आमिर खान यांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आमिर खानचे रजनीकांत यांच्या प्रती प्रेम, आदर पाहून नेटकरी भारावून गेले आहे. सर्वत्र आमिर खानच्या या कृतीचे कौतुक होताना दिसत आहे. 'कुली'मधील आमिर खानचा कॅमिओ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'कुली' चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे. तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'कुली' चित्रपट

'कुली' चित्रपटात आमिर खानही छोट्याशा भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात आमिर एका खास अंदाजात पाहायला मिळणार आहे. 'कुली' हा गँगस्टर ड्रामा आहे. चित्रपटात अभिनेते रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. 'कुली' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात नागार्जुन, सत्यराज, उपेंद्र, श्रुती हासन आणि सौबिन शाहीर हे कलाकार झळकणार आहेत.

'कुली' कधी रिलीज होणार आहे?

14 ऑगस्ट

'कुली' कोणत्या भाषांमध्ये रिलीज होणार?

तमिळ, हिंदी, तेलुगु , कन्नड

'कुली'मध्ये मुख्य भूमिकेत कोण?

अभिनेते रजनीकांत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : नवरा बायकोच्या वयात किती वर्षांचं अंतर असलं पाहिजे?

Dogs Attack : दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसले, झोपलेल्या महिलेचे लचके तोडले; सांगलीत मोकाट कुत्र्यांचा कहर

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन- राज ठाकरे

Pune Crime: पुण्यात सैराट! भरचौकात जावयाला बेदम मारलं, लेकीचं अपहरण केलं, प्रेमविवाह केल्याच्या रागातून आईचं भयंकर कृत्य, VIDEO समोर

Remedies in Bhagavad Gita: अतिविचाराने मनस्ताप होतोय, मन ताळ्यावर राहत नाही, भगवान कृष्णांनी भगवद्‌गीतेत सांगितला रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT