Aamir Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : आमिर खान मराठी बोलायला कधी शिकला? स्वतः सांगितला किस्सा

Aamir Khan Talk On Marathi Language : बॉलिवूड अभिनेता आमिर खान एका मुलाखतीत मराठी भाषेबद्दल बोलला आहे. आमिर खान मराठी कधी बोलायला शिकला,जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’मुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात नुकत्याच झालेल्या एका मिडिया मुलाखतीत त्याने मराठी भाषेसंबंधित मोठे वक्तव्य केले आहे. त्याने मुलाखतीत सांगतले की, “मला मराठी येत नसल्याने लाज वाटायची” आमिर खानने 44 व्या वर्षी मराठीचे धडे घेतले आहेत.

मुलाखतीत मराठी भाषेबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला की, “मला थोडं थोडं मराठी बोलता येत. 15 वर्षांपूर्वी मला जाणवले की मला हिंदी, इंग्रजी बोलता येते. पण मराठी बोलता येत नाही. जेव्हा कोणी मराठीत बोलतात तेव्हा मला काही समजत नव्हते. माझी मातृभाषा उर्दू आहे ती मला बोलता येते पण वाचता येत नाही. तेव्हा माझी राज्यभाषा मराठी मला बोलता येत नसल्याची लाज वाटली. त्यामुळे तेव्हा मी मराठी शिकलो. मी चार वर्षे मराठीचे शिक्षण घेतले. मला सुहास लिमये यांनी मराठी शिकवली. आम्ही मराठीत गप्पा मारायचो. अनेक विषयांवर बोलायचो. तेव्हा मला मराठीचे महत्त्व समजलं.”

'सितारे जमीन पर'

'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख देखील झळकणार आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर आणि जिनिलियासोबत इतर अनेक नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले. आमिर आणि जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

SCROLL FOR NEXT