Bollywood actor Aamir Khan cried after the screening of his film Lal Singh Chadha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : लाल सिंह चड्ढाच्या अपयशानं आमिर खान डिप्रेशनमध्ये?

‘लाल सिंह चड्ढा’ ला अतिशय थंड प्रतिसाद मिळाल्याने आमिरला जबर धक्का बसला?

Satish Daud

Aamir Khan Latest News : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal singh chaddha) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. हा चित्रपट हॉलिवूड फिल्म ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. आमिर खान या चित्रपटात एका शिखाच्या भूमिकेत आहे. मानसिक दृष्टया फिट नसलेल्या व्यक्तीचा रोल आमिरने निभावला आहे. आमिरच्या या चित्रपटावरून बराच वाद झाला. या चित्रपटात शिखांचा अपमान झाल्याचा आरोप अनेकांनी केला. इतकंच नाही तर चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली. दरम्यान, चित्रपटामुळे आमिर खान डिप्रेशनमध्ये गेला असल्याची माहिती त्याच्या जवळच्या मित्राने दिली. (Aamir Khan Latest News)

‘लाल सिंह चड्ढा’ ला अतिशय थंड प्रतिसाद मिळाल्याने आमिरला जबर धक्का बसला. यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आहे, तो कुणाचेही फोन उचलत नाहीये. अशी माहिती त्यांच्या जवळच्या मित्राने दिली. तब्बल ६ वर्षांनी आमिरची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे अधिकार घ्यायला आमिरला तब्बल १० वर्ष लागली. मात्र, इतकं करूनही चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मोहिम सुरू झाली.

दरम्यान, ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित होऊनही, विकेंडमध्ये चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. विशेष बाब म्हणजे चार पाच दिवसांची सुट्टी असून सुद्धा प्रेक्षकांनी चित्रपटाला म्हणावं तसा प्रतिसाद दिला नाही. मागील काही वर्षाचं गणित बघता आमिरच्या चित्रपटाला मिळालेला हा सर्वात कमी प्रतिसाद आहे. आणि हीच गोष्ट मनात धरून तो डिप्रेशनमध्ये गेला असल्याची माहिती आहे. (Aamir Khan News)

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अवघ्या पाच दिवसांमध्ये केवळ ४८ कोटी रुपयांचा गल्ला जमला आहे. बॉक्स ऑफिवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद न मिळाल्यानं आमिर खूच निराश झाला असून त्याला मोठा धक्का बसला. आमिरच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिनेमा अपयशी ठरल्यानं तो खूपच दुःखी झाला आहे. त्यातच त्यानं सिनेमाच्या वितरकांना त्यांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT