Aamir Khan and gauri Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार; स्वत:च तारिख सांगितली, म्हणाला...

Aamir Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्राट ५ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. आमिरने स्वतः लग्नाची बातमी जाहीर करत नात्याला अधिकृत स्वरूप देणार असे म्हटले आहे.

Shruti Vilas Kadam

Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अनेक दिवसांपासून आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. अनेक नेटकरी तो ५ जूनला गर्लफ्रेंड स्प्राटसोबत लग्न करणार असल्याचे बोलत होते. आता स्वत: आमिरने गौरीसोबत लग्न होणाऱ्या बातमीला दुजोरा दिला असून, येत्या ५ जुलै रोजी दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

'व्हरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत आमिरने सध्या तो अमेरिकेत असल्याचे सांगत लग्नाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले. अमिर या गोड बातमी विषयी सांगताना म्हणाला. 'होय, लग्नाबाबतच्या बातम्या खऱ्या आहेत. आम्ही ५ जुलैला लग्न करणार आहोत. गौरी आणि मी एकमेकांबद्दल अत्यंत गंभीर आहोत. आमचे नाते खूप मजबूत आहे. माझ्या मनात मी आधीच स्वतःला तिचा पती मानतो. त्यामुळे आता या नात्याला अधिकृत स्वरूप देणे ही आमच्यासाठी स्वाभाविक गोष्ट आहे.' विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी आमिरने गौरीसोबतचे त्याचे नाते जसे आहे तसेच त्याला आनंददायी वाटत असल्याचेही त्याने सांगितले होते. मात्र, कालांतराने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिरच्या वैवाहिक आयुष्याकडे पाहिल्यास, त्याने १९८६ मध्ये चित्रपट निर्माती रीना दत्ता यांच्याशी पहिले लग्न केले होते. २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी लग्न केला. मात्र, २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, गौरी स्प्राट ही बेंगळुरूमध्ये राहत असून ती एक प्रसिद्ध फॅशन डिझाईनर आहेत.तिचे यापूर्वीही लग्न झाले होते आणि त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. गेल्या दोन वर्षांपासून गौरी आणि तिचा मुलगा मुंबईत राहत आहेत. आमिर आणि गौरी यांची ओळख तब्बल २५ वर्षांपूर्वीची आहे. अनेक वर्षे ते मित्र होते त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. २०२५ मध्ये आपल्या ६० व्या वाढदिवशी आमिरने गौरीसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र दिसले. आता त्यांच्या लग्नाच्या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT