aamir khan third wedding with gauri spratt reports saam tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खान करतोय तिसरं लग्न? तारीखही ठरली, होणारी बायको कोण?

Aamir khan and gauri spratt wedding date revealed : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा तिसरं लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गर्लफ्रेंड गौरीसोबत तो विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली आहे.

Nandkumar Joshi

मिस्टर फरफेक्शनिस्ट, मोजके पण आशयघन चित्रपट करणारा बॉलिवूड अभिनेता अशी ओळख, फिल्मी कमी आणि पर्सनल लाइफमुळं नेहमी चर्चेत असलेला आमिर खान आता तिसरं लग्न करणार असल्याचं वृत्त धडकलंय. गेल्याच वर्षी आमिरनं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आमिर खान गर्लफ्रेंड गौरीसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीखही ठरल्याचे सांगितले जात आहे.

आमिर खाननं वाढदिवशी मीडियासमोर गौरी स्प्रॅटची गर्लफ्रेंड म्हणून ओळख करून दिली होती. त्यानंतर आमिर आणि गौरी हे दोघेही प्रत्येक इव्हेंटमध्ये एकत्र जात होते. कौटुंबिक कार्यक्रम असो वा एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन, तिथे दोघे एकत्रच जात होते. आता आमिर खान गौरीसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आमिर खानकडून मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मात्र, या दोघांच्या लग्नाची तारीख ठरली आहे, असं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं.

रिपोर्ट्सनुसार, आमिर खान पुढच्या महिन्यात म्हणजेच ५ जुलैला लग्न करणार आहे. गौरी ही आमिर खानपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. तिला एक मुलगा देखील आहे. दोघांनीही रजिस्टर्ड लग्न करण्याचा विचार केला आहे. त्यावेळी कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच उपस्थित असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. आता दोघांनी लग्न करण्याचं मनोमन ठरवलं आहे. हे दोघेही लग्नाच्या तयारीला लागले असून, लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

आमिर खानचं पहिलं लग्न रीना दत्ता हिच्यासोबत १९८६ मध्ये झालं होतं. तर किरण राव हिच्यासोबत २००५ मध्ये दुसरं लग्न केलं होतं. एक दशकाहून अधिक काळ सोबत राहिलेल्या आमिर आणि किरण यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्या आयुष्यात गौरी आली. २० वर्षांपासून गौरीला ओळखत असल्याचे आमिरने माध्यमांना सांगितले होते. पण दोन वर्षांपासून त्यांचं नातं घट्ट झाल्याचेही तो म्हणाला. गौरी ही आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊससोबतही काम करत होती. ती बेंगळुरूला राहत होती. तिला एक ७ वर्षांचा मुलगा आहे. गौरी आणि त्याच्या नात्याला कुटुंबीयांनी स्वीकारल्याचंही आमिर म्हणाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padma Awards: रोहित शर्मा, आर. माधवन यांच्यासह महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना 'पद्म' पुरस्कार प्रदान

गुटखा मिळत नसल्याने कॅब चालकाचं डोकं फिरलं! आयुक्त तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडिओ केला व्हायरल

कुछ बडा होने वाला है! भाजप ३ राज्यातील मुख्यमंत्र्यांना CM पदावरून हटवणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण; १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकाऱ्यांचा होणार सन्मान

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर फिरायला नेऊन केतन अग्रवालचा घात

SCROLL FOR NEXT