Aai Kuthe Kay Karte Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte: अनिशने केला अरुंधतीचा विश्वासघात; ईशाच्या लग्नाने देशमुख-केळकर कुटुंबात वादाची ठिणगी

Aai Kuthe Kay Karte Latest Update : 'आई कुठे काय करते' मालिकेत इशाच्या लग्नामुळे दोन्ही कुटुंबात नवीन वादळ आल्याचे दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aai Kuthe Kay Karte NEW Promo (Isha Get Married):

'आई कुठे काय करते' मालिकेत नवीन वळण येत आहेत. मालिकेत रोज काहीतरी नवीन ड्रामा पाहायला मिळतो. रोजच्या नवीन कथानकामुळे प्रेक्षक ही मालिका लोक आवर्जून पाहतात. सध्या मालिकेत ईशाच्या लग्नामुळे दोन्ही कुटुंबात नवीन वादळ आल्याचे दिसत आहे.

'आई कुठे काय करते' ही मालिका रोज घराघरात पाहिली जाते. मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनिश आणि ईशाच्या लग्नामुळे नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेची सोशल मीडियावरही खूप चर्चा असते. मालिकेच्या आजच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रोमोत सुरवातीला देशमुख कुटुंबातील काही सदस्य ईशाची पाठवणी करताना दिसत आहेत. प्रोमोच्या सुरवातीला यश ईशाला सल्ला देत आहे.

यश ईशाला म्हणतो,'आजपर्यंत तुझ्या, माझ्या आणि अभीच्या आयुष्यात मोठ्या अडचणी तेव्हाच आल्या जेव्हा आपण आईचं ऐकलं नाही. तेव्हा प्लीज आता तरी आईचं ऐक'. त्यानंतर ईशा अरुंधतीकडे बघत रडताना दिसते. त्यानंतर अरुंधती आणि आशुतोषमधील संवाद होताना दिसतो. 'ईशाचं कसंय ना तिला तिच्या स्वप्नाळू दुनियेतून सतत भानावर आणावं लागतं.

हे सगळं अनिश करु शकेल की नाही याबद्दल मला शंका होती. पण त्याने आज हे सिद्ध केलं आहे की, तो हे नाही करु शकत. ही तर फक्त सुरवात आहे. मला नाही माहित पुढे काय वाढून ठेवलंय?'. हे सर्व संभाषण होत असताना घरात खाली अनिश ईशासाठी गृहप्रवेशासाठी माप ठेवताना दिसतो.

मालिकेत सध्या ईशाचं लग्न झालेलं दाखवलंय. ईशा-अनिशच्या लग्नाचा अनिरुद्ध आधीच विरोध करत होता. त्यात ईशाच्या लग्नामुळे अनिरुद्ध चिडला आहे. ईशाने वडिलांऐवजी अनिशची निवड केल्याने अनिरुद्धच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो तिला घराबाहेर जाण्यास सांगतो.

मालिकेत पहिल्यापासूनच ईशा ही थोडी अल्लड आणि हट्टी दाखवण्यात आली आहे. हट्टापोटी ईशाने लग्न तर केलंय. पण या लग्नाला अनिरुद्धने विरोध केला आहे. तर आता ईशाच्या अचानकपणे लग्न करण्याच्या निर्णयावर अरुंधतीला धक्का बसलाय. त्यामुळे आता सर्वजण अनिश-ईशाचं नात स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले आहे.

ईशा- अनिशचं नात कोणतं नवीन वळण घेणार? अनिरुद्ध ईशा आणि अनिशला माफ करणार का? ईशाच्या या निर्णयामुळे अरुंधतीला कोणत्या नवीन संकटाला सामोरं जावं लागणार? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT