Madhurani Gokhale Prabhulkar Post For Jayant Sawarkar Saam TV
मनोरंजन बातम्या

Madhurani Gokhale Prabhulkar Post : अण्णा, तुम्ही दिलेली कौतुकाची थाप... अरुंधतीने पोस्ट शेअर करत जयंत सावरकरांच्या आठवणींना दिला उजाळा

Madhurani Share Post : मधुराणी गोखले प्रभुलकरने देखील पोस्ट करत जयंत सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Pooja Dange

Madhurani Gokhale Prabhulkar Post For Jayant Sawarkar : जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी आज या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जयंत सावरकर यांच्या स्मरणार्थ अनेक मराठी कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

जयंत सावरकर यांनी अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटामध्ये काम केला आहे. जयंत सावरकर मराठीतील सुप्रसिद्ध मालिका आई कुठे काय करतेमध्ये देखील अधूनमधून दिसायचे.

या मालिकेत कलाकारांनी त्याचण्यासाठी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. रुपाली भोसलेच्या पोस्टनंतर आता मधुराणी गोखले प्रभुलकरने देखील पोस्ट करत जयंत सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Latest Entertainment News)

मधुराणी गोखले प्रभुलकरची पोस्ट

अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकरने पोस्ट करत लिहिले आहे, 'अण्णा.. या गाण्यानंतर तुम्ही दिलेली कौतुकाची थाप कधीही विसरू शकणार नाही.

तुम्ही अभिनयाचा चालता बोलता परिपाठ होतात. तुम्हाला काम करताना बघतसुद्धा आम्ही खूप काही शिकलो. तुम्ही तुमच्या नकळत किती शिकवलंत आम्हाला. ओम शांती'

ही पोस्ट शेअर मधुराणीने जयंत सावरकर असलेला मालिकेतील एक सीन देखील शेअर केला आहे. या सीनमध्ये मधुराणी (अरुंधती) दयाघना हे गाणे गात आहे. तर अरुंधती आणि तात्या मामासह (जयंत सावरकर) मालिकेतील इतर कलाकार कांचन, अप्पा, अभिषेक, यश, ईशा देखील दिसत आहेत.

जयंत सावरकर यांनी अनेक नाटक मालिका आणि चित्रपटामध्ये काम केले आहे. जयंत सावरकर यांनी वायाच २०व्या वर्षांपासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'एकच प्याला'मधील तळीराम, 'तुझे आहे तुजपाशी'तील आचार्य, 'व्यक्ती आणि वल्ली'मधील अंतू बर्वा आणि हरितात्या या त्यांच्या गाजलेल्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

SCROLL FOR NEXT