Sara Kahi Tichyasathi Serial New Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sara Kahi Tichyasathi Serial New Promo: ‘आई कुठे..’फेम अभिनेत्रीने मालिका सोडली? आता दिसणार नव्या भूमिकेत.. ‘सारं काही तिच्यासाठी’, मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

Khushboo Tawade New Serial: आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मन जिंकणारी खुशबू लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Chetan Bodke

Sara Kahi Tichyasathi Serial New Update: ‘आई कुठे काय करते’ फेम वीणा अर्थात खुशबू तावडेची सध्या मालिकेत कमालीची चर्चा सुरू आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मन जिंकणारी खुशबू लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोची सध्या चर्चा सुरू आहे. झी मराठीवर ही मालिका टेलिकास्ट होणार असून या मालिकेचं नाव ‘सारं काही तिच्यासाठी’ असं आहे. खुशबू सोबत या मालिकेत अभिनेते अशोक शिंदे आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हे लोकप्रिय चेहरे देखील दिसणार आहे.

मालिकेची कथा दोन सख्ख्या बहिणींवर आधारित आहे. त्या दोघीही बहिणी गेले २० वर्ष एकमेकींना भेटलेल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय, तर छोटी बहीण संध्या तिच्या मुलीसोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे.

दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडते, ज्यामुळे त्या एकमेकींपासून कायमच्या दुरावलेल्या आहेत. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही.

आजही असा एक दिवस जात नाही जेव्हा उमा आणि संध्याला एकमेकींची आठवण येत नसेल. उमाचा नवरा रघुनाथ खोत हे गावातील मोठे प्रस्थ आहे. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. २० वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले.

पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी गोष्टींचा विरोध करणारे रघुनाथ, लंडनमध्ये वाढलेल्या संध्याच्या मुलीला स्वीकरतील का? २ बहिणींमध्ये असे काय घडलेले ज्यामुळे दोघी एकमेकींना कायमच्या दुरावल्या?

अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे "सारं काही तिच्यासाठी " रघुनाथ रावांच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेते 'अशोक शिंदे' दिसणार आहेत, उमाची भूमिका साकारणार आहे 'खुशबू तावडे' आणि संध्याच्या भूमिकेतून 'शर्मिष्ठा राऊत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने कॅप्शन दिले की, ‘अंतर आलं तरी तुटत नाहीत रक्तांची नाती, नवी मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’’ ही मालिका २१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका बंद होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका ६:३० वा. प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पण ही मालिका बंद होईल की, पुढे चालूच राहणार याबद्दल मालिकेने अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT