Rupali Bhosale Offer To Bigg Boss 18 
मनोरंजन बातम्या

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला Bigg Boss 18 ऑफर ? चर्चांना उधाण

Bigg Boss 18 Contestant : 'आई कुठे काय करते' मधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला 'बिग बॉस १८' साठी विचारण्यात आल्याचे वृत्त आले आहे.

Chetan Bodke

सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीत 'बिग बॉस' या रिॲलिटी शोची जोरदार चर्चा सुरू आहे. 'बिग बॉस मराठी ५' नंतर आता लवकरच 'बिग बॉस १८'ची चर्चा सुरू आहे. 'बिग बॉस मराठी ५' ला टीआरपीमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी बिग बॉसमध्ये काही बॉलिवूड सेलिब्रिटीही पाहायला मिळत आहे. आता 'बिग बॉस १८'मध्येही मराठी सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहे. 'आई कुठे काय करते' मधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला 'बिग बॉस १८' साठी विचारण्यात आल्याचे वृत्त आले आहे. नेमकी कोण आहे ती अभिनेत्री जाणून घेऊया...

'आई कुठे काय करते' मालिकेला चाहत्यांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारांचीही जोरदार चर्चा होत आहे. मालिकेमध्ये संजनाचं पात्र साकारणाऱ्या रुपाली भोसलेला 'बिग बॉस १८'साठी विचारण्यात आले आहे.

राजश्री मराठीला त्यांच्या विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस १८'मध्ये सहभागी होण्यासाठी रुपाली भोसलेला ऑफर देण्यात आले आहे. रुपाली यापूर्वी 'बिग बॉस मराठी २'मध्ये सहभागी झाली होती. आता मराठीनंतर रुपाली हिंदीमध्येही दिसणार म्हणून चाहते उत्सुक आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने नवं कोरं घर खरेदी केले. अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रसिद्ध झालेली रूपाली कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर स्टायलिश अंदाजात फोटो शेअर करत असते. चाहत्यांकडून नेहमीच तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

black & white : महापालिका निवडणुकीत शिवसेना यशस्वी होईल का? ठाकरेंनी दिले थेट उत्तर, म्हणाले...

ICC ultimatum Bangladesh: भारतात खेळा किंवा पॉईंट्स गमवा; ICC कडून थेट बांगलादेशाच्या क्रिकेट बोर्डला अल्टिमेटम

Makar Sankranti Decoration Ideas: कमी खर्चात करा हटके डेकोरेशन, यंदा मकरसंक्रांतीला सजवा तुमचं घर

Maharashtra Live News Update: घड्याळाला मतदान करा म्हणत अजित पवारांचा शिवसैनिकांना सॅल्यूट

Skin Hair Care: थंडीत त्वचा कोरडी आणि केस निस्तेज झालेत? मग, वापरून पाहा 'हा' सोपा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT