Aai Kuthe Kay Karte Daily Update  Instagram
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte Daily Update: अरूंधतीच्या अनुपस्थितीत घरात मोठे वादळ, ती जाताच अनिरूद्धचे कट कारस्थान सुरू...

Aai Kuthe Kay Karte Latest Promo: आशुतोष अरूंधतीला विमानतळावर सोडायला गेला असताना, इथं ऑफिसमध्ये नितीनच्या हाती वीणाने स्वाक्षरी केलेलं कॉन्ट्रॅक्ट लागतं.

Chetan Bodke

Aai Kuthe Kay Karte Latest Episode:‘आई कुठे काय करते’ या मालिकेची फक्त सिनेसृष्टीतच नाही तर सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरू असते. मालिकेत गेल्या आठवड्यात अरूंधतीला परदेशात जाण्याची संधी मिळाली आहे, ती परदेशात आपल्या गाण्या करिता जात असल्याची माहिती मिळत आहे. सध्या मालिकेत रोजच वेगवेगळे ट्वीस्ट प्रेक्षकांसमोर येत असताना ती आजच्या भागात परदेशात जाण्यासाठी निघाली आहे. यावेळी तिच्या घरचांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या तिला शुभेच्छा दिल्या तर तिच्या रक्षणासाठी आणि कामावरील लक्ष दुर्लक्षित होऊ नये, यासाठी सरस्वतीची मूर्ती भेट देतात. तर यश आणि अनिशने अरूंधतीकडून गिटारवर सही घेतली, हा क्षण तिच्यासाठी खास असल्याचे दिसले.

आशुतोष अरूंधतीला विमानतळावर सोडायला गेला असताना, इथं ऑफिसमध्ये नितीनच्या हाती वीणाने स्वाक्षरी केलेलं कॉन्ट्रॅक्ट लागतं. तेव्हा नितीनला अनिरूद्धने केलेला सर्व घोळ त्याला कळतो. अनिरुद्धने या कंपनीतून त्याच्या न कळत आशुतोषचं नाव काढून टाकल्याचं त्याच्या लक्षात येतं आणि तो लगेच आशुतोषला कळवतो. त्याचवेळी नितीनला अनिरुद्धने वीणाच्या कंपनीत स्वत:ला ५० टक्के भागीदार करुन घेतल्याचा घोळ सुद्धा त्याला तेव्हाच कळाला. वीणाला या फेरफाराबद्दल समजते तेव्हा तिला पण काही वेळेसाठी धक्का बसतो. (Entertainment News)

सहाजिकच तिला हा मोठा धक्का पचवणं कठीण जातं. वीणा लगेचच कबुल करते की, कॉन्ट्रॅक्टमधून आशुतोषचं नाव काढायला तिने अनिरुद्धला सांगितलं नव्हतं. त्याने असं का केलं हा प्रश्न नितीनसह वीणाला पडलाय. अनिरुद्ध तिथे पोहोचल्यावर वीणा त्याला याविषयी जाब विचारते. (Marathi Film)

अनिरूद्ध वीणाला म्हणतो, “मी कोणालाच फसवलेलं नाही. कोणालाच फसवण्याचा हेतू माझा नव्हता. तुम्ही सर्वांनी कॉन्ट्रॅक्ट न वाचता, घाईगडबडीत सही कराल असं मला वाटलं नव्हतं. मी सगळं सांगणार त्याचवेळी तुम्ही सर्व अरुंधतीच्या नादात होते.” अनिरूद्ध पुढे वीणाला हे देखील सांगतो की, तुला मी नवं कॉन्ट्रॅक्ट मेल केलंय. कंपनीचं भलं कसं होईल या दृष्टीने अनिरूद्ध वीणाला समजवतो. ती कंपनी आशुतोषची असून तोच त्या कंपनीला वेळ देऊ शकत नाही, अस म्हणत तो तिला समजावतो. (Marathi Serial)

अनिरूद्धच्या मनात काही सुडबुद्धीने विचार आला असून तो आता वीणाला पूर्णपणे बाजूने करण्याच्या विचारात आहे. जर तुला वाटत असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट फाडून टाक, मी तुझा बिझनेस पार्टनर आहे, मला प्रत्येक निर्णयासाठी नितीन किंवा आशुतोषचं ऐकावं लागणार असेल तर या बिझनेसमध्ये मला काडीचाही रस नाही. असं म्हणत अनिरुद्ध वीणाला कॉन्ट्रॅक्ट फाडायला सांगतो. तर दुसरीकडे, यश गौरीच्या आठवणीत व्याकूळ होताना दिसतो. एक म्युझिक बनवताना त्याला गौरीची आठवण येते. त्याचं गाणं गौरीपर्यंत पोहोचावं अशी त्याच्या मनात भावना आहे. (Marathi News)

पुढच्या एपिसोडमध्ये सुलेखाताई आणि आशुतोषला नितीन सांगतो की, वीणापासून दुर राहायला हवं. कारण तिची खेळी आपल्यासाठी खूपच घातक असेल असे म्हणत त्यांना तो समजवतो. अरूंधतीच्या अनुपस्थितीत घरात मोठे वादळ येणार असून सर्वांनाच मालिकेत पुढे काय होणार हे जाणण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Accident News : लातूरमध्ये कारची दुचाकीला जोरात धडक, ३ तरूणांचा जागीच मृत्यू

Bindusara Dam : बीडकरांची चिंता मिटली; मुसळधार पावसात बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो

ठाकरेंचा भाजपाला धक्का; रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत महिला नेत्यानं हाती घेतली मशाल

SCROLL FOR NEXT