A Valentine's Day Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

A Valentine's Day: प्रेमाच्या दिवसात काय रहस्य दडलंय? 'अ व्हॅलेंटाईन्स डे' चित्रपटाचा टीझर लॉन्च

Marathi Movie: प्रेम करणाऱ्यांचा खास दिवस असलेल्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित आज झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

A Valentine's Day Movie:

प्रेम करणाऱ्यांचा खास दिवस असलेल्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित आज झाला आहे. तगडी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून, रहस्यमय आणि रंजक असा हा टीझर आहे.

त्यामुळे चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. टीझरच्या सुरुवातीलाच आश्विनी कुलकर्णी आणि संजय खापरे हे पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स अँड एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे फैरोज अनवर माजगावकर, सैन निराळे, श्रीकांत सिंह आणि सह निर्मात्ये म्हणूनअनिल वहाने आणि सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे या चित्रपटाचे निर्मात्ये आहेत. (Latest Marathi News)

तर रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद अजित दिलीप पाटील यांनी लिहिली असून पटकथा याची देखील जबाबदारी रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी निभावली. अभिनेता संजय खापरे, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, अभिनेता अरुण कदम, अभिनेता अभिजित चव्हाण, अभिनेता फैरोज माजगावकर, अभीनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसेल. साई पियुष, एलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे.

टीझर मधून हा चित्रपट सीरियल किलर या विषयावर असल्याचा अंदाज येत आहे. तसंच चित्रपटात आई मुलाच प्रेम देखील दिसून येत आहे.चित्रपटाचा लुक देखील फ्रेश दिसत आहे. मात्र चित्रपटाच्या कथेत काय रहस्य दडल आहे? हे चित्रपट प्रत्यक्षात पहिल्यासच समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Bar Recipe : जीममधून आल्यावर खा 'हा' प्रोटीन बार, मिळेल तुफान एनर्जी

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने ग्लॅमरस जगाला ठोकला रामराम अन् बनली संन्यासी, नेमकं झालं काय?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ८ दिवसात खुशखबर मिळणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT