Love Kills Season 2
Love Kills Season 2  Saam TV
मनोरंजन बातम्या

Love Kills Season 2: सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा ज्यामुळे एकाच कुटुंबातील ७ जणांचा झाला मृत्यू, लव्ह किल्स लवकरच भेटीला

Pooja Dange

Love Kills 2 Update: डिस्कव्हरी प्लस सत्य घटनेवर आधारित अनेक शो दाखविले जातात. ६ एप्रिलला असाच एका सत्य घटनेवर आधारित शो प्रदर्शित होणार आहे. 'लव्ह किल्स' या मालिकेचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृदय पिळवटून टाकणारी कथा 'लव्ह किल्स: शबनम आणि सलीम अमरोहा मर्डर केस' तुम्हाला विचार कार्याला भाग पडेल.

2008 मध्ये एका उन्हाळाच्या रात्री, अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गाव एका तरुण मुलीच्या वेदनादायक किंकाळ्यांनी जागे झाले. ही मुलगी मदतीसाठी याचना करत होती. तिच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला होता. शबनम नावाच्या या मुलीच्या मदतीसाठी धावलेले लोक आले तेव्हा जे घडले होते ते दृश्य पाहून थक्क झाले.

त्या मुलीच्या घरातील सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. एका साध्या भारतीय शहरी कुटुंबाच्या दुःखद मृत्यूने अमरोहासह संपूर्ण देश हादरला. याकडे संपूर्ण प्रसारमाध्यमांचे लक्ष गेले आणि तपास अधिकाऱ्यांनी तपास केला असता एक खळबळजनक सत्य समोर आले.

मदतीसाठी आरडाओरडा करणाऱ्या या अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकराच्या साथीने तिच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्याचा कट रचला होता. शबनम आणि सलीम यांचे एकमेकांवर प्रेम होते. शबनमने इंग्रजी आणि भूगोल या विषयात दुहेरी एमए केले आहे आणि ती एका प्राथमिक शाळेत शिकवत होती, तर सलीमने सहावीनंतर शिक्षण सोडले आणि उदरनिर्वाहासाठी करवती कारखान्यात काम करत होता.

शबनम ही उच्च सैफी मुस्लिम कुटुंबातील मुलगी होती आणि सलीम पठान होता. या कथेला एक भयंकर वळण मिळाले जेव्हा दोघांनी मिळून पूर्ण जाणीवेत, शबनमच्या 11 महिन्यांच्या पुतणीसह शबनमच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.

यामागे एकच कारण होते की त्या दोघांना एकत्र राहायचे होते. आज ते दोघेही या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा भोगत आहेत. शबनमला फाशी देण्यात येईल तेव्हा ती स्वतंत्र भारतातील पहिली महिला असेल जिला एखाद्या गुन्ह्यासाठी फाशी दिली जाईल.

लव्ह किल्स: टाईम्स क्रॉनिकलवरील शबनम आणि सलीम अमरोहा मर्डर केस 6 एप्रिल 2022 रोजी डिस्कव्हरी+ इंडियावर प्रीमियर होईल आणि हिंदी, तमिळ, तेलगू, इंग्रजी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रवाहित केले जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT