Sonam Kapoor With Her Baby  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor | सोनम कपूरच्या कुशीत बाळ? व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घ्या!

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सोनम हॉस्पिटलमधील बेडवर झोपली असून तिच्या कुशीत बाळ दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा (Sonam Kapoor) एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल(Viral) होत आहे. या फोटोमध्ये सोनम हॉस्पिटलमधील बेडवर झोपली असून तिच्या कुशीत बाळ दिसत आहे. सोनमने त्या बाळाला घट्ट मिठी मारली असल्याचे दिसते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिचे चाहते आणि नेटकरी तिचं अभिनंदन करत आहेत, तर काही तिच्यावर प्रेमवर्षाव सुरू आहे. मात्र, या व्हायरल फोटोमागील सत्य वेगळंच आहे.

सोनम कपूर बाळाला घट्ट मिठी मारत असलेला हा फोटो बोगस आहे. या फेक फोटोमध्ये सोनम कॅमेऱ्याकडे पाहताना पोझ देत आहे. पण हा फोटो खोटा आहे. सोनमचा हा फोटो मॉर्फ म्हणजेच एडिट करण्यात आला आहे. एकंदरीत, इंटरनेटवर व्हायरल होणारा हा फोटो पूर्णपणे खोटा आहे.

सोनम कपूर सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. सोनमने यावर्षी मार्चमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून सोनम सतत तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. तिने बेबी बंपसोबत ग्लॅमरस फोटोशूटही केले आहे. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाले होते.

सोनम कपूरने नुकताच पती आनंद आहुजा, बहीण रिया कपूर आणि इतर मित्रपरिवारासोबत डोहाळे जेवणाचा सोहळा साजरा केला. सोनमने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर पोस्ट केले होते.

सोनम कपूर शेवटची 'ए.के वर्सेस ए.के' या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिने स्वतःची म्हणजे सोनम कपूरचीच भूमिका साकारली होती. यापूर्वी तिने 'द झोया फॅक्टर' या चित्रपटामध्ये काम केले होते. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हँडसम TC ला पाहून तरुणी पडली प्रेमात, VIDEO

Aadhaar Card: नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा 'आधार'; नागरिकत्वासाठी आधार कार्ड ग्राह्य धरा, निवडणूक आयोगाला आदेश

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

SCROLL FOR NEXT