Bathukamma New Song From Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Saam TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan New Song: तेलंगणातील अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडणार; 'किसी का भाई किसी की जान'मधील नवे गाणे प्रदर्शित

New Song From Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: 'किसी का भाई किसी की जान'मधील 'बथुकम्मा' हे नवीन गाणे प्रदर्शित

Pooja Dange

Bathukamma Song Represent Telangana's Culture: सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा 'किसी का भाई किसी की जान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी माहिती निर्माते प्रेक्षकांपर्यंत घेऊन जात आहेत आणि चित्रपटविषयीची उत्सुकता वाढवत आहेत. त्यात आता निर्मात्यांनी चित्रपटातील 'बथुकम्मा' हे नवीन गाणे प्रदर्शित केले आहे.

'बथुकम्मा' ही तेलंगणातील एक परंपरा आहे, ही परंपरा महिला नऊ दिवस साजरी करतात. या गाण्यात सलमान खान पारंपारिक तेलुगू पोशाखात दिसत आहे.

हे गाणे सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे आणि त्यात पारंपारिक आणि आधुनिक संगीताचे मिश्रण दाखविण्यात आले आहे.

पूजा हेगडेचा या गाण्यातील डान्स खूप सुंदर आहे. रंगीबेरंगी सेटअप, पारंपारिक तेलुगु पोशाख आणि 200 बॅकग्राऊंड डान्सर या सगळ्याने गाणे नटले आहे. तेलंगणामधील परंपरा, तिथली संस्कृती प्रेक्षकांना सहज आकर्षित करते.

या गाण्याचे वैशिष्ट्य असे की, हे गाणे त्या उत्साहाच्या वेळी चित्रित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल आणि कनेक्ट करेल. 'बथुकम्मा'चे संगीत रवी बसरूर यांनी दिले आहे. संतोष वेंकी, आयरा उडुपी, हरिणी इवातुरी, सुचेथा बसरूर, विजयालक्ष्मी मेटिनाहोले यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याला शब्बीर अहमद, रवी बसरूर, किन्नल राज आणि हरिणी इवातुरी यांनी लिहिले आहे.

'किसी का भाई किसी की जान' फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

November Travel: नोव्हेंबरमध्ये पिकनिक प्लॅन करताय? मग 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Thursday Horoscope: काहींना प्रवासातून लाभ, काहींना पैशांची तंगी जाणवणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

Woolen Clothes: थंडीत लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT