Kapil Sharma
Kapil Sharma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma : कपिल शर्माची क्रेझ सातासमुद्रापार, 'जबरा' फॅनने दिली ही खास भेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kapil Sharma Got Gift | मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचे(Kapil Sharma) जगभरात खूप चाहते आहेत. जे नेहमी कपिल शर्माला फॉलो करत असतात. कॉमेडियन सध्या टोरंटो (कॅनडा)मध्ये आहे. जिथे तो गेल्या महिन्यापासून लाइव्ह शो करत आहे. आता अलीकडेच कपिल शर्माच्या एका फॅनने परदेशात त्याला एक खास भेट देऊन आश्चर्यचकीत केले आहे.

कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत. जे त्याला नेहमी काही ना काही भेट देत असतात. कपिलही त्याच्या चाहत्यांची भेट प्रेमाने स्वीकारतो. आताही कपिलच्या एका फिमेल फॅनने त्याला परदेशात एक खास भेटवस्तू दिली आहे. कपिल शर्माची फॅन पलक भांबरी ही बरेच तास कपिलला भेटण्यासाठी थांबली होती, त्यानंतर तिने कपिलला भेटून एक 'स्केच' गिफ्ट केले. पलकने तिच्या सोशल मीडिया(Social media) अकाउंटवर कपिलसोबतचा फोटो शेअर केला आहे. कपिलने हा फोटो रिपोस्ट करत 'धन्यवाद' लिहून पलकचे मनापासून आभार मानले आहेत.

कपिल शर्मा लवकरच दुसऱ्या लाइव्ह शोसाठी त्याच्या सहकाऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यानंतर तो मुंबईत परत येईल आणि त्याच्या शोचे म्हणजे द कपिल शर्मा शोचे शुटींग सुरू करेल. कपिल शर्मा शोच्या नवीन सीझनमध्ये फ्रेश चेहरे दिसणार आहेत, ज्यासाठी कास्टिंग देखील सुरू करण्यात आले आहे. एजन्सी सध्या नवीन कलाकारांच्या शोधात आहे. त्याचवेळी, चाहत्यांनी सोशल मीडियावर सुनील ग्रोव्हरला शोमध्ये परत आणण्याची मागणी केली आहे. द कपिल शर्मा शोमध्ये सुनील ग्रोवर डॉ. मशूर गुलाटीच्या भूमिकेत दिसला होता.

२०१७ मध्ये कपिलसोबत कटथ्रोट झाल्याने त्याने शो सोडला होता. या शोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, सुदेश लेहरी आणि चंदन प्रभाकर यांच्या नावाचा समावेश आहे. या शोबद्दल असे बोलले जात आहे की हा शो सप्टेंबरच्या आसपास प्रसारित होईल. पुन्हा एकदा अर्चना पूरण सिंह या शोमध्ये जजच्या भूमिकेत परत येऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT