Famous Actor Video saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Video : वाढलेले केस अन् हातात सुटकेस; बॉलिवूडचा सुपरस्टार रस्त्यावर भटकतोय, अवस्था पाहून ओळखणंही कठीण

Famous Actor Viral Video : ९० च्या प्रसिद्ध अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. व्हिडीओत अभिनेता हातात सुटकेस घेऊन जाताना दिसत आहे.

Shreya Maskar

९० च्या प्रसिद्ध अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओत अभिनेत्याची खूप वाईट परिस्थिती दिसत आहे.

व्हिडीओत अभिनेत्याला ओळखणे कठीण झाले.

प्रसिद्ध अभिनेत्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. १९९० मध्ये प्रदर्शित झालेला 'आशिकी' हा चित्रपट हा कायम प्रेक्षकांचा आवडता राहिला आहे. आजही चित्रपटाची गाणी प्रचंड गाजतात. 'आशिकी' चित्रपटात अभिनेते राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल या मुख्य भूमिकेत होत्या. त्यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता 'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉयचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमधील त्याच्या बदललेल्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेता राहुल रॉय मुंबईतील वर्सोवा येथे दिसला. व्हिडिओमध्ये राहुल एक जड बॅकपॅक आणि हातात सुटकेस घेऊन चालताना दिसत आहे. त्याने क्रीम रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम जीन्स घातली आहे. लांब केसांमुळे राहुल त्याच्या जुन्या चित्रपटांतील लूकपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसत होता. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला आपल्या शांत आणि गोड स्वभावने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

नेटकऱ्यांना अभिनेत्याचा हा लूक खूपच आवडला आहे. लांब केसांमध्ये राहुल रॉय हँडसम दिसत असल्याच्या कमेंट्स येत आहेत. मात्र राहुल रॉय अशा अवस्थेत रस्त्यावर काय करत आहे, असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे. व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिलं की, "पण तो रस्त्यावर असा काय करत आहे आणि त्याच्या बॅगमध्ये काय आहे?" दुसऱ्या युजरने लिहिलं की, "मी त्याला एका क्षणासाठी ओळखू शकलो नाही..." तर तिसऱ्या युजरने लिहिलं की, "शेवटी प्रेमींचे असेच असतात..."

'आशिकी' चित्रपट

१९९० मध्ये प्रदर्शित झालेला 'आशिकी' हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत खूप गाजला. याची गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हा चित्रपट महेश भट्ट दिग्दर्शित आहे. ही एक सुंदर प्रेमकथा आहे. चित्रपटात राहुल रॉय , अनु अग्रवालसोबत दीपक तिजोरी, अवतार गिल, रीमा लागू आणि जावेद खान हे कलाकार देखील झळकले आहेत. त्यांचे 'बस एक सनम चाहिए आशिकी के लिए' हे गाणे तुफान गाजले. राहुल रॉय हे 'बिग बॉस हिंदी'च्या पहिल्या सीझनचे विजेते ठरले. त्यांनी 'सपने साजन के', 'फिर तेरी याद आई' ,'जानम' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: थलपती विजय उद्या 3.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

निदा खानला आश्रय देणं भोवलं; एमआयएमच्या नेत्याच्या घर आणि ऑफिसवर चालणार बुलडोझर|VIDEO

Nashik Tourism: दूर जायची गरजच नाही! नाशिकपासून फक्त २ तास अंतरावर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Konkan Tourism : कोकणात मामाच्या गावाला गेलाय? मग 'हा' स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारा एकदा पाहाच

भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT