Ranbir Kapoor And Alia Bhatt Dance On Jamal Kadu Song in 2024 Filmfare Awards Saam Tv
मनोरंजन बातम्या

रणबीर आणि आलियाने डोक्यावर ग्लास ठेवून धरला 'जमाल कुडू' गाण्यावर ठेका, Filmfare Awards मधील VIDEO होतोय व्हायरल

Ranbir Kapoor And Alia Bhatt Dance On Jamal Kadu Song: 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सर्वाधिक चर्चेत असलेला व्हिडिओ रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आहे.

Priya More

69th Filmfare Awards Video:

69 व्या फिल्मफेअर अवॉर्ड (69th Filmfare Awards) रविवारी गुजरातमध्ये पार पडला. या फिल्मफेअर अवॉर्डची सगळीकडे चर्चा होती. फिल्मफेअर अवॉर्ड शो 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स पोहोचले होते. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सोहळ्यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt And Ranbir Kapoor) या कपलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यात संपूर्ण लाइमलाइट या कपलनेच खाल्ले. या कपलचा फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 शोमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या दमदार आणि हटके ड्रेसिंग स्टाइलमध्ये हजेरी लावली. 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सर्वाधिक चर्चेत असलेला व्हिडिओ रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर 69 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या मंचावर त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटातील 'जमाल कुडू' या हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मात्र तो अचानक स्टेजवरून खाली येतो आणि पत्नी आलियासोबत डान्स करू लागतो.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही आपल्या डोक्यावर काचेचा ग्लास ठेवून जमाल कुडू गाण्यावर डान्स करताना दिसतात. आलिया देखील रणबीरची डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. या दोघांच्या डान्स पाहून अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित असलेले सर्वजण टाळ्या वाजवतात. यानंतर रणबीर पुन्हा स्टेडकडे निघून जातो. स्टेजवर जाण्यापूर्वी रणबीर आलियाच्या गालावर किस करतो. आलिया आणि रणबीरच्या या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर कमेंट्स करत दोघांच्याही चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट्स करत लिहिले की , रणबीर आणि आलिया त्यांचे आयुष्य खुलेपणाने जगत आहेत. त्यांची मुलगी खूपच भाग्यवान आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'यांची जोडी खूपच सुंदर आहे.' दरम्यान, या अवॉर्ड सोहळ्यामध्ये रणबीर कपूरला 'ॲनिमल'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Smartphone Features: तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेली 'ही' गुप्त फीचर्स माहिती आहेत का? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Prajakta Mali: खुशखबर! प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' आता मोफत पाहायला मिळणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT