juhi chawla saam tv
मनोरंजन बातम्या

Juhi Chawla: 5G नेटवर्क प्रकरणात जुही चावलाचा १८ लाखांचा दंड झाला कमी; 'हे' करावं लागेल

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) अभिनेत्री जुही चावला (Bollywood actress Juhi Chawla) आणि इतर दोघांना ठोठावण्यात आलेला दंड २० लाख रुपयांवरून दाेन लाख रुपयांपर्यंत आणण्याचा प्रस्ताव दिला. दरम्यान हा निर्णय देताना न्यायालयाने जूहीस काही अटी घातल्या आहेत. संबंधित अभिनेत्री एक सेलिब्रिटी असल्याने तिला सामाजिक काम करावं लागेल असे न्यायालयाने म्हटलं आहे.

5G तंत्रज्ञानाचा (5G Network) मानव आणि प्राण्यांवर विपरित परिणाम होईल असा दावा करीत अभिनेत्री जूही चावलाने (juhi chawla) याचिका दाखल केली होती. एकल न्यायाधीशांनी गतवर्षी ही याचिका फेटाळून लावली होती. त्यावेळी याचिकाकर्ते जूही चावला यांना २० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. ही याचिका केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिसत आहे असा शेरा देखील न्यायालयाने मारला हाेता. संबंधित याचिका फेटाळण्याच्या आदेशाविरोधात जूही चावला व अन्य दोघांनी अपील केले हाेते. त्याची सुनावणी दिल्ली न्यायालयात (delhi court) नुकतीच झाली.

दंडाची रक्कम कमी होऊ शकते, पण जुही चावलाला काही सामाजिक कार्य करावे लागेल, अशी अट खंडपीठाने वकिल सलमान खुर्शीद (salman khurshid) समोर मांडली. खंडपीठाने म्हणाले दंडाची रक्कम पूर्णपणे माफ करणार नाही, परंतु एका अटीसह आम्ही ती २० लाखांवरून दोन लाखांपर्यंत कमी करू. तुमचा क्लायंट सेलिब्रेटी आहे आणि त्यांचा पब्लिक प्रेझेन्स आहे असे गृहीत धरून त्यांनी काही सामाजिक कामही केले पाहिजे. त्यांची प्रतिमा आणि स्थान समाजाला काही सार्वजनिक कामासाठी, काही चांगल्या मोहिमेसाठी आणि चांगल्या कारणासाठी वापरता येईल.

न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरण (DSLSA) तिच्याशी संपर्क साधेल आणि ती कोणतेही सार्वजनिक हिताचे काम करू शकेल.

जूहीचे वकील सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या क्लायंटसाठी हा सन्मान असेल आणि संधी असेल. याबाबत अभिनेत्री चावला कडून तिची संमती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळाने खुर्शीद यांनी खंडपीठास अभिनेत्री जूही चावला यांनी हे सुचविल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले आहे आणि त्यांनी सामाजिक कामास मान्यता दिली आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT