crime Saam tv
मनोरंजन बातम्या

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला अटक करण्यात आली आहे. या कोरिओग्राफरवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

साम टिव्ही

नवी दिल्ली : प्रसिद्ध तेलुगू कोरिओग्राफर जानी मास्टरला पोलिसांनी अटक केली आहे. जानी मास्टरवर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर पोलिसांनी जानी मास्टरला पोलिसांनी अटक केली आहे. जानी मास्टरचं खरं नाव शेख जानी आहे. जानी मास्टरला अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

स्त्री २ सिनेमातील एका गाण्यासाठी सहकार्य करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा कोरिओग्राफरवर आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी कोरिओग्राफरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी कोरिओग्राफर जानी मास्टरला अटक केली आहे. जानीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गोव्याच्या विशेष कोर्टात हजर करण्यात येणार होतं. २१ वर्षीय तरुणीने लैगिंक छळाचा आरोप केल्यानंतर गोव्याच्या विशेष ऑपरेशन पथकाने तेलुगू कोरिओग्राफर जानीला अटक केली.

पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं की, 'बाहुबली आणि 'पुष्पा: द राइज' सारख्या सिनेमात काम करणाऱ्या प्रसिद्ध कोरिओग्राफर जानीला गोव्याच्या सायराबाद पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोर्टाकडून 'ट्राजिंट वॉरंट' मिळाल्यानंतर त्यांना हैदराबादला आणलं जाणार आहे.

सायराबाद आयुक्तालयाच्या अंतर्गत पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तरुणीने पोलिसांत कोरिओग्राफरच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मागील सहा वर्षांपासून जानीने शुटिंगदरम्यान त्याच्या घरात लैगिंक छळ केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीने तेलंगाना राज्य महिला आयोगाला ४० पानी अहवाल पाठवला होता. तरुणी १६ वर्षांची असताना पहिल्यांदा कोरिओग्राफर जानीने अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दरम्यान, जानी प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. त्याने हिंदी आणि दक्षिण भारतीय सिनेसृष्टत काम केलं आहे. त्याने स्त्री २ सिनेमा एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. त्यात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर देखील आहे. आरोपी कोरिओग्राफर हा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरानंतर पवन कल्याण यांच्याकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT