Raj Thackeray Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Thackeray: नाट्यक्षेत्राला उभारी आणण्यासाठी काय करावं?, नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर राज ठाकरेंनी उघड केल्या मनातल्या गोष्टी

Priya More

100th Marathi Natya Sammelan:

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १०० व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये (100th Marathi Natya Sammelan) हजेरी लावत प्रकट मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी नाटकातील कलाकावंताचे कौतुक केले. 'नाटक आणि मी' याविषयावर बोलताना त्यांनी त्यांचे नाटकाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. यावेळी राज ठाकरे यांनी नाटक (Drama), चित्रपट (Movie) या विषयांवर बोलताना ही दोन्ही क्षेत्र मोठी करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे असे मत व्यक्त केले आहेत. त्याचसोबत त्यांनी 'नाट्यक्षेत्र मोठं करण्यासाठी पुढाकार घेईल.', असे आश्वासन दिलं. राज ठाकरे यांनी या प्रकट मुलाखतीमध्ये नेमकं काय सांगितलं हे आपण जाणून घेणार आहोत...

राज ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'नाटक पाहिलं नाही असं महाराष्ट्रात कुणी असेल असं मला वाटत नाही. मला चित्रपट आणि नाटकाबद्दल आस्था आहे. फिल्म मेकिंग हे माझं पहिलं प्रेम आहे. मी अ‍ॅनिमेशन स्टुडिओ काढले होते. अ‍ॅनिमेशपेक्षा मला नाटकात जास्त कुतूहूल आहे. आताच्या तरूणांना या क्षेत्रात खूप संधी आहेत. पण ते रील्स आणि व्हिडीओमध्ये अडकली आहेत. मला चित्रपट समजतो. चित्रपट हे माध्यम मला चांगलेच समजते. पण मला कुतूहुल नाटकाचे जास्त आहे.'

'आजपर्यंत मला नाटक ही गोष्ट समजली नाही. एका चौकोनात सगळा विषय नाटकात कसा आणतात हे मला कळलेलं नाही. आपल्यासमोर हे सगळं जग निर्माण करणं आणि तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला लावणं हे काही सोपं नाही. ही सगळ्यात मोठी त्या निर्मात्यांची ताकद आहे. म्हणून नाट्यक्षेत्र हे सर्वात कठीण माध्यम आहे. आमच्या भाषणात आणि नाटकात रिटेक नाही. मला वाटतं नाटक हे सर्वात कठीण क्षेत्र आहे. चित्रपटामध्ये आपण नॅरेशन देऊ शकतो, एडिटिंग करू शकतो. नाटकात सगळं जग उभं करणं सोपं नाही.', असे देखील त्यांनी सांगितले.

तसंच, 'नाटक ते अटक हा मराठ्यांचा इतिहास आहे. अटके पार मराठ्यांनी झेंडे फडकवले. आमच्या भाषणात आणि नाटकात रिटेक नाही. मला वाटतं नाटक हे सर्वात कठीण क्षेत्र आहे. नाट्यक्षेत्र मोठं करण्यासाठी पुढाकार घेईन. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठे विषय हाताळले गेले पाहिजे. सर्वांनी मोठी उडी घेणं गरेजेचे आहे. सरकारने देखील नाट्य क्षेत्रांना प्रोत्साहन द्यावे.', असे राज ठाकरेंनी सांगितले. त्याचसोबत , 'लतादीदींनी माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले. त्यांच्यासारखा स्पष्ट आवाज कुणाचाच नाही. लतादीदींवर लवकरच एक पुस्तक आणणार असल्याचे आश्वासन यावेळी राज ठाकरे यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT