Mumbai University Saam Tv
शिक्षण

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्युज, 'या' परिक्षा ढकलल्या पुढे

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतरच परीक्षा होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या (University Of Mumbai) हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतरच परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाने सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार होत्या. आता त्या पुढे ढकलण्यात आल्या असून दिवाळीनंतरच या परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हे सत्र उशीरा सुरु झाल्यामुळे पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्याचबरोबर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली. त्यानुसार विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात आला. 2022 च्या हिवाळी सत्राच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा , मानव्य विद्याशाखा , विज्ञान तसेच तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा अधिक परीक्षा होणार आहेत.

या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले की, 2022 च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT