pet exam pune university Saam TV
शिक्षण

PET Exam : पुणे विद्यापीठाची PhD प्रवेश पूर्व परीक्षा पुढे ढकलली, कारण काय?

Namdeo Kumbhar

Pune university PET Exam : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत (Savitribai Phule Pune University) घेण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा (PET Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. आधी 24 ऑगस्ट रोजी पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा होणार होती. महाराष्ट्र बंद मुळे 31ऑगस्ट रोजी होणार आहे.

PET परीक्षेचे (PhD admission PET exam) सुधारीत प्रवेशपत्र लवकरच विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पेट परीक्षेच्या इतर कोणत्याही बाबींमध्ये बदल होणार नसल्याचे शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ.मुंजाजी रासवे यांनी सांगितले.

परीक्षा पुढे ढकलली, कारण काय ?

शनिवार २४ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे विद्यापीठामार्फत PET परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. प्रसारमाध्यमात त्या संदर्भातील बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब अथवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा २४ ऑगस्ट ऐवजी आता ३१ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे.

10 हजार 600 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे. पुणे , अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर पेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठामार्फत या परीक्षेची सर्व तयारी झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना 19 ऑगस्ट पासूनच परीक्षेसाठीचे हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहेत. पण महाराष्ट्र बंद मुळे आता परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारीत प्रवेश पत्र लवकरच उपलब्ध करुन दिले जाईल, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

SCROLL FOR NEXT