Pune MPSC News : पुण्यात एमपीएससीचा लढा, नेमक्या मागण्या काय? VIDEO

Pune MPSC Protest News : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचा लढा सुरू आहे. विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनानंतर एमपीएससीची २५ ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, परीक्षार्थींनी नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन केलं? पाहा

25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुण्यात परीक्षार्थींचा लढा सुरू आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस होता. मोठ्या संख्येने परीक्षार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. दुसरीकडे २५ ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळं परीक्षार्थींच्या लढ्याला यश आल्याचं मानलं जात आहे.

नेमक्या काय होत्या परीक्षार्थींच्या मागण्या?

IBPS आणि MPSC परीक्षा एकाच दिवशी होणार होती. दोन्ही परीक्षा २५ ऑगस्टला असल्याने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी

कृषी विभागाच्या पदांचा समावेश राज्यसेवा आयोगात करण्यात यावा.

कृषीच्या २५८ जागांबाबत निर्णय घेण्यात यावा

⁠कम्बाईन ग्रुप बी आणि सी मधील हजारो जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करावी

⁠राज्यसेवेच्या १५०० जागांची जाहिरात प्रसिद्ध करा

या मागण्यांचे नोटिफिकेशन आल्यावरच आंदोलन मागे घेणार असल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com